अभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार | ias Abhijit Bangar as Thane Municipal Commissioner after replacing Dr. Vipin Sharma | Loksatta

अभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार

गेल्या आठवड्यापासून पालिका तसेच राजकीय वर्तुळात शर्मा यांची बदली निश्चित झाली असल्याची चर्चा सुरू झाली होती.

अभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

ठाणे : महापालिका आयुक्त पदावर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची राज्य सरकारने नियुक्ती केली असून ते शुक्रवारी दुपारी ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची बदली होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. गेल्या आठवड्यापासून पालिका तसेच राजकीय वर्तुळात शर्मा यांची बदली निश्चित झाली असल्याची चर्चा सुरू झाली होती.

असे असतानाच शुक्रवारी राज्य सरकारने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, त्यांच्या बदलीमुळे रिक्त जागेवर झालेल्या नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची राज्य सरकारने नियुक्ती केली असून ते शुक्रवारी दुपारी 3 वाजता ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत,अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Video : “रश्मी ठाकरेंनी देवीसमोर शक्तीप्रदर्शन करून…”, शिंदे गटाचा खोचक टोला; बाहेरून गर्दी आणल्याचा दावा!

संबंधित बातम्या

डोंबिवलीतील ३८ बेकायदा इमारतींमधील एक हजार सदनिकांचे खरेदी-विक्री व्यवहार रोखले
सुदृढ आरोग्याचा संदेश देत सायकल स्वारांची कल्याण-गुजरात मोहीम,तीन दिवसात ४२० किमी अंतर पार
ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच

व्हिडिओ

ताज्या बातम्या
दोन लाख ८१ हजार मतदारांची नावे वगळली; पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघांतील मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार
“जर चिनी आणि कोरियन करू शकतात तर आपण…” रौप्य पदाकामागील वेदनेच्या झालरवर मीराबाई चानूचा हुंकार
“त्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही…” केदार शिंदे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक
Khakee वेब सीरिजचे ‘रीअल हिरो’ सस्पेंड; आयपीएस अमित लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप!
आधी कॉफी डेट अन् आता थेट लॉंग ड्राइव्ह; अक्षया-हार्दिकच्या रोड ट्रिपचा फोटो व्हायरल