कल्याण येथील पूर्व भागात जे प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता कर थकबाकीदारांच्या निवासी, व्यापारी संकुलातील एकूण पाच मालमत्ता बुधवारी टाळे लावले. या मालमत्ताधारकांकडे कराची २५ लाख ६८ हजार रूपयांची थकबाकी आहे.

या थकबाकीदारांना वारंंवार नोटिसा देऊनही ते कर भरणा करत नसल्याने जे प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांच्या उपस्थितीत थकबाकीदारांचे गाळे, मालमत्तांना टाळे लावण्याची कारवाई करण्यात आली. या मालमत्ता काटेमानिवली, देवळेकरवाडी भागातील आहेत.

हेही वाचा >>>डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी प्रभाग स्तरावरील कर विभागातील कर्मचाऱ्यांना मालमत्ता कर थकबाकीदारांकडील कर रक्कम वसुलीचे आदेश दिले आहेत. गेल्या दोन महिन्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे पालिका कर्मचारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त होता. त्यामुळे मालमत्ता कर वसुली थंडावली होती.

हेही वाचा >>>नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग, उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे आयुक्तांचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या तीन महिन्याच्या काळात मालमत्ता कर वसुलीचा लक्ष्यांक पूर्ण करायाचा असल्याने दहा प्रभागातील साहाय्यक आयु्क्त दररोज कर थकबाकीदारांच्या मालमत्ता शोधून त्यांना टाळे लावण्याची कारवाई करत आहेत. ग, फ, अ प्रभागात ही कारवाई अधिक जोमाने सुरू आहे. मालमत्तांना टाळे लावल्यानंतरही थकबाकीदारांनी थकित रक्कम भरणा केली नाहीतर पालिकेकडून या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर लिलाव प्रक्रिया करून या मालमत्तांमधील कर थकबाकी वसूल केली जाणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.