कल्याण – गोळीबाराच्या घटनेनंतर शनिवारी रात्री व्दारली गावातील एका महिलेने भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने तक्रार केली. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून आमदार गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मधुमती उर्फ निता एकनाथ जाधव या तक्रारदार आहेत. त्या कुटुंबीयांसह व्दारली गावात राहतात. त्यांचे पती एकनाथ हे कल्याण येथे प्रवासी रिक्षा चालविण्याचे काम करतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांच्यासह विकासक संस्थेचे भागीदार जितेंद्र पारीख, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, मंगेश बारघेट यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – ठाणे – बोरिवली दुहेरी बोगद्याच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा, अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली

व्दारली येथील जमीन प्रकरणावरून आमदार गायकवाड गावात आले होते. त्यावेळी जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली. आम्हाला खालच्या जातीचे म्हणून हिणवले, अशी तक्रार निता जाधव यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

हेही वाचा – वाढदिवसानिमित्त कार्यक्रम न करण्याचे श्रीकांत शिंदे यांचे शिवसैनिकांना आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोळीबाराच्या घटनेनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गायकवाड यांना विविध गुन्ह्यांत हेतुपुरस्सर अडकविण्यासाठी असे गुन्हे दाखल केले जात आहेत, असे आमदार गायकवाड समर्थकांंनी सांगितले.