बदलापुरात निकृष्ट रस्तेकामांचा फटका

मुसळधार पावसामुळे बदलापूरमधील रस्तेकामे किती निकृष्ट झाली आहेत, याची प्रतिची आली. पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडले आणि त्यात पाणी साचले.

मुसळधार पावसामुळे बदलापूरमधील रस्तेकामे किती निकृष्ट झाली आहेत, याची प्रतिची आली. पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडले आणि त्यात पाणी साचले. त्याचा फटका रहिवाशांना आणि वाहन चालकांना बसला. शहरात कुठेही नाले तुंबल्याने व पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती ओढावलेली नव्हती.
बदलापूर पूर्वेला अतिथी हॉटेल ते अभ्युदय बँक, रेल्वे स्थानकालगत असलेला रस्ता व महेश ज्वेलर्ससमोरील रस्ता, नगर परिषदेसमोरील रस्ता तसेच कात्रप भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डय़ांमधून पाणी साचले होते. दरम्यान, समर्थ चौक, पूर्वेला रेल्वे स्थानक तिकीट घरासमोर, रमेशवाडी आदी भागात झाडे कोसळल्याचे प्रकार घडले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bad roads in badlapur