महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन फारच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. आधी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये आणि १२ एप्रिल रोजी ठाण्यात आयोजित केलेल्या उत्तर सभेमध्ये राज यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासंदर्भात राज्य सरकारवर निशाणा साधत हे भोंगे काढण्यासाठी ईदपर्यंतचा म्हणजेच ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिलाय. राज यांनी केलेलं भाषण आणि अशापद्धतीने अल्टीमेटम दिल्याने अनेकांनी त्यांची तुलना थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी केलीय. याचसंदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हे गुण राज यांच्याकडून बाळासाहेबांकडून आल्याचं म्हटलंय.

नक्की वाचा >> “शरद पवार राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देतायत म्हणजे…”; मनसे नेत्यानं वक्तव्य केला आनंद

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ईदपर्यंतचा म्हणजेच ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिलेला असल्याचा मुद्दा उपस्थित करत यावरुन राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची तुलना केली जातेय, अशा अर्थाने नांदगावकरांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “बाळासाहेब हे फार वेगळे होते. त्याच्याबद्दल बोलणं उचित ठरणार नाही. पण खरं जर पाहिलं तर मला आज बाळासाहेबांच्या तालमित तयार झालेले, लहानाचे मोठे झालेले, त्यांचं बोट धरुन मोठे झालेले राज ठाकरे त्यांच्यापासून बरंच काही शिकलेलं आहेत, असं वाटतं. राज यांनी बाळासाहेबांकडून घेतलेली शिकवण उभा महाराष्ट्र नाही संपूर्ण देश आणि जग पाहतंय. बाळासाहेबांचे बरेच गुण त्यांच्याकडे असल्याने अल्टीमेटम हा उपजत गुण सुद्धा त्यांच्याकडे आलेलाच आहे,” असं उत्तर नांदगावकर यांनी दिलं.

MP Dhananjay Mahadik, Leads Campaign for Mahayuti, Sanjay Mandlik, Kolhapur lok sabha seat, Rajarampuri peth, Shahupuri peth, people united to campaign,
संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पदफेरीत राजारामपूरी, शाहूपूरी व्यापारी पेठ एकवटली
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
MLA Ganpat Gaikwads wife campaigns against Shinde attends rally with Vaishali Darekar
आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार, वैशाली दरेकरांसोबत रॅलीत सहभागी
Devendra Fadnavis slams jayant patil
“जयंत पाटील नाराज…”, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नक्की वाचा >> “ब्लु प्रिंट, विकासाच्या कल्पना मशिदींवरील भोंगे, मदरश्यांवर येऊन थांबतात तेव्हा…, राज ठाकरे म्हणजे…”; MNS नेत्याची राजीनाम्याची पोस्ट

गुरुवारी डोंबिवलीमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या पुतणीच्या लग्नासाठी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे ,मनसे नेते अमित ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर आले होते. अनेक दिग्गजांनी या लग्नाला हजेरी लावली होती. याचवेळी नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.