नवरात्रोत्सवानिमित्त डोंबिवलीत भाजपातर्फे ‘नमो रमो नवरात्री’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात या क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता आणि कल्याण लोकसभा शिवसेनेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांची उपस्थिती होती. कल्याण डोंबिवलीतील शिवसेना-भाजपामधील राजकीय वातावरण खेचाखेची, धुसफुसीचे बनले आहे. मात्र, या वातावरणाकडे दुर्लक्ष करुन अमृता फडणवीस आणि वृषाली शिंदे यांनी एकत्र येत देवीचे दर्शन घेतले. तसेच मिसेस फडणवीसांच्या गाण्यावर ठेकाही धरला.

हेही वाचा- दसऱ्यानिमित्त प्रवाशांकडून डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात लोकल पूजन

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

अमृता फडणवीस आणि वृषाली शिंदे यांनी गरबा खेळायच्या मैदानात प्रवेश करताच गरबा खेळता खेळता महिला, पुरुष, तरुण, तरुणींनी जल्लोष केला. गेल्या काही महिन्यांपासून विकास कामे, निधी वरुन खा. शिंदे, मंत्री चव्हाण यांच्यात धुसफूस सुरू आहे. ती दूर करुन दोघांनी एकत्र येऊन विकास कामे करावीत म्हणून खासदार पत्नी वृषाली या नवरात्रोत्सावाचेनिमित्त करुन भाजपच्या नवरात्रोत्सवाला आल्या का, अशी चर्चा गरबा मंडपात सुरू होती.

अमृता, वृषाली यांचे गरबा मंडपात आगमन होताच एकच जल्लोष करण्यात आला. देवीचे दर्शन घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अमृता, वृषाली यांचे पुष्पगुच्छ, देवीचा प्रसाद देऊन स्वागत केले. अमृता फडणवीस व्यासपीठावर येताच गरबा खेळणाऱ्यांकडून ‘गाणे गाणे’ असा जल्लोष सुरू झाला. गरबा मंडपातील तुफान गर्दी, गरबा खेळकऱ्यांचा उत्साह पाहून अमृता यांनी खेळकऱ्यांना नाराज न करता ध्वनीक्षेपक हातात घेतला. आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. उपस्थित गर्दीवर एक कटाक्ष टाकत अमृता फडणवीस यांनी ‘ दमादम मस्त कलन्दर, अली दमदम दे अन्दर, ओ लाल, मेरी पत्त रखियो बला झुले लालण, सिन्धडी दा, सेवन दा, सखी शाहबाज कलन्दर, दमादम मस्त कलन्दर, अली दम दम दे अन्दर’ या गाण्याचा मुखडा गाऊन उपस्थितांना थिरकायला लावले. वाद्य वृंदाच्या तालावर अमृता यांनी गायलेल्या या गाण्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गरबा खेळकऱ्यांकडून पुन्हा एकदा असा जल्लोष सुरू झाला होता.

हेही वाचा- उद्या दुपारपासून ठाण्यात अवजड वाहतूक बंद

‘गरबा खेळण्यासाठी एवढी गर्दी आणि उत्साह प्रथमच आपण डोंबिवलीत अनुभवला. हा स्त्रीशक्तीचा जागर आहे. याठिकाणी जात, पात, धर्म, पंथ न बघता विविध प्रकारचे लोक येऊन गरबा खेळतात हे खूप कौतुकास्पद आहे. आपण गरबा अनेक ठिकाणी पाहिले पण एवढी उत्स्फूर्त गर्दीचा गरबा प्रथमच पाहत आहोत. अशा एकत्र येण्याने आपण आनंदित होतो. आपल्यावरील संकटे, दुख विसरतो. अशा कार्यक्रमातून आपली उर्जा खर्च होऊन शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. असे स्त्री शक्ती जागाचे उपक्रम उत्साहात साजरे झाले पाहिजेत,’ असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा- CM शिंदे धमकी प्रकरणात अमृता फडणवीसांची उडी; यशोमती ठाकूरांना टोला लगावताना म्हणाल्या, “खराब लोकांच्या…”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणाऱ्या धमक्यांबद्दल नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेल्या विधानबद्दल अमृता यांनी सांगितले, धमक्या आणि देशाच्या स्थितीचा काहीही संबंध नाही. अशी उलटसुलट विधाने करणाऱ्यांची मानसिकता काय पध्दतीची आहे त्याचे दर्शन त्यांच्या विधानातून होते. त्याची फार दखल घेण्याची गरज नाही, असेही त्या म्हणाल्या.