कल्याण : छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कल्याण शहर भाजपतर्फे मंगळवारी शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक आणि कल्याणचे माजी आ. नरेंद्र पवार, कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. महिला, पुरुष कार्यकर्ते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा – डोंबिवलीत शंकेश्वरनगरमध्ये मोटारीच्या धडकेत पाळीव श्वान ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी राजे हे कधीच धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य करून खळबळ उडून दिली होती. याविषयी राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. हिंदुत्ववादी, मराठा समाजाच्या नेत्यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. वाहतुकीला अडसर येणार नाही अशा पद्धतीने ही निदर्शने करण्यात आली. त्यामुळे शिवाजी चौकातील वाहतूक सुरळीत सुरू होती.