पादचाऱ्यांना लुटणे, मोबाईल चोरी, महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून पळून जाणे हे प्रकार कल्याण डोंबिवलीत सर्रास सुरू आहेत. आता चोरट्यांनी मोटारींमधील टेप चोरीचे प्रकार सुरू केले आहेत. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, ठाणकरपाडा येथे मोटारीच्या काचा फोडून आतील टेप चोरुन नेले आहेत.कल्याण, डोंबिवलीतील अनेक वाहन मालकांच्या मोटीर इमारतीच्या आवारात वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावर उभ्या केल्या जातात.

हेही वाचा >>>टिटवाळ्याजवळील सिग्नल बिघाडामुळे लोकल उशिरा

शनिवारी, रविवारी रात्री या चोऱ्या करण्यात आल्या आहेत.लक्ष्मीकांत तायडे (रा. साई संकुल, खडकपाडा, कल्याण), स्नेहांशु दत्ता, अक्षय सदगीर (रा. शिवांजली निवास, ठाणकरपाडा, कल्याण) या तीन वाहन मालकांच्या मारुती सुझुकी, स्वीफ्ट अन्य एका कारच्या काचा फोडून चोरट्यांनी कारमधील कारटेप चोरुन नेले आहेत. सदगिर आणि त्यांचे दोन सहकारी यांनी आपल्या मोटार कार घरा समोरील रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. रात्रीच्या वेळेत चोरट्याने तीन कारच्या वाहन चालकाच्या बाजुच्या काचा फोडून कारमध्ये प्रवेश करुन कारमधील एकूण ७० हजार रुपये किमतीचे टेप चोरुन नेले. तायडे यांच्याही वाहनातील कारटेपची अशाच पध्दतीने चोरी करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>>कल्याण मधील कोटक महिंद्रा बँकेत बनावट नोटा जिरवण्याचा ग्राहकाचा प्रयत्न

खडकपाडा, बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी मोटार मालकांनी तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी गुन्हे दाखल करुन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तपास सुरू केला आहे.कारटेप भंगार विक्रेत्यांना विकले जाण्याची शक्यता गृहित धरुन पोलिसांनी शहरातील भंगार विक्रेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे.