मंगळवारी ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उत्तर सभा घेतली. गुढीपाडव्याच्या सभेनंतर होणारी टीका आणि उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी ही सभा असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. मात्र आता या सभेच्या ठिकाणी झालेल्या एका कृतीमुळे राज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यामध्ये राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नक्की वाचा >> “मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही असं ते म्हणाले, मी सांगू इच्छितो की…”; शरद पवारांचं राज ठाकरेंना उत्तर

महाराष्ट्राच्या गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरेंविरोधात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यामधील सभेमध्ये राज यांनी स्टेजवरुन तलवार म्यानातून काढून दाखवल्याने त्यांनी आर्म्स अॅक्टचं उल्लंघन केल्याचा ठपका राज यांच्यावर ठेवण्यात आलाय. तलवार दाखविल्याप्रकरणी त्यांच्यासह सुमारे १० जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> “राज ठाकरेंचा जन्म झाला त्या दिवशी शरद पवार…”; राज यांच्यासोबतचा पवारांचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीचा टोला

राज ठाकरे काल साडेसातच्या सुमारास मूस रोडवरील सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांचा भगवी शाल आणि तलवार देऊन स्वागत करण्यात आलं. यानंतर राज यांनी म्यानातून तलवार बाहेर काढून ती उंचावून दाखवली. याच प्रकरणी आता ठाण्यातील नौपाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नौपाडा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कायदा कलम ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ व २५ प्रमाणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ७ ते ८ जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी…”; पवार नास्तिक असल्याच्या वक्तव्याला फोटो शेअर करत राष्ट्रवादीचं उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच, असा निर्वाणीचा राज यांनी मंगळवारच्या सभेतून दिला. शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून लक्ष्य ठरलेल्या राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली़  त्यात त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडल़े राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद बोकाळला, या वक्तव्याचा राज यांनी पुनरुच्चार केला.