वसई पूर्वेकडील कंपन्यांकडून नियम धाब्यावर
प्रसेनजीत इंगळे,
वसई पूर्वेकडील अनेक रासायनिक कंपन्यांनी सुरक्षेच्या आणि पर्यावरण नियमांचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीतून निघणारे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच खाडीत आणि नाल्यात सोडले जात आहे. यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वसई शहराचा पूर्व पट्टय़ातील बहुतांश भाग हा औद्योगिक वसाहतीचा असून चार हजारांहून अधिक छोटय़ा मोठय़ा कंपन्या कार्यरत आहेत. या ठिकाणी अनेक नव्या औद्योगिक कंपन्या तयार होत आहेत. वसईच्या पूर्व भागातील गोलानी, वालीव, धुमाळ नगर, वसई फाटा, खैरपाडा, चिचपाडा, गावराईपाडा, सातीवली, भोयदापाडा, अग्रवाल, कामण, चिंचोटी, रिचर्ड कम्पाउंड, वाकणपाडा, शालीमार परिसरात बेकायदेशीर रासायनिक कंपन्या उभ्या राहू लागल्या आहेत. यातील बहुतांश कंपन्यांना कोणतेही परवाने नाहीत. त्यामुळे या कंपन्या सुरक्षेचे तसेच प्रदूषण नियमाक मंडळांच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.
या कंपन्यांतून रोज निघणारा कचरा आणि विषारी पाणी सर्रास उघडय़ावर, स्त्यालगत, नाल्यात टाकला जातो. तसेच रसायनयुक्त सांडपाणी कोणतीही प्रकिया न करता नाल्यात सोडले जाते.
प्रक्रिया न करताच रासायनिक पाणी खाडीत
कंपनीतून निघणार्म्या पाण्याला मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी येत असते. तसेच धुरामुळे श्व्सनाचे विकार, खोकला, डोळ्यांची जळजळ आदी तरास होत आहे. रोगाराई पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. हे रसायनयुक्त पाणी छोटय़ा मोठय़ा नाल्यातून शेतात आणि खाडीत जात आहे. यामुळे शेकडो हेक्टर जमीन नापीक झाली आहे. तर पाणवठे दुषित झाले आहेत. हिरव्या, पिवळ्या, निळ्या लाल रागाचे पाणी सर्रास वसईच्या औद्योगिक वसाहतीत नाल्यात पाहायला मिळत आहे.
काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारचे पाणी पिवून ७ गाई मेल्याची घटना घडली होती. यावेळी या परिसरातील स्थानिकांनी या कंपन्याच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. पण आजतयागत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक महापालिका प्रसाशन या कंपन्याच्या विरोधात आजही गंभीर नसल्याची तक्रार येथील स्थानिकांनी केली आहे. या कंपन्या कायदा धाब्यावर बसवून रसायनयुक्त पाणी उघडी गटारे, नाले तसेच रस्त्यालगत सोडत आहेत, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. या केमिकल कंपन्यांचा नागरिकांना तसेच पर्यावरणाला मोठा त्रास होत आहे, अनेकवेळा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही, कंपनीतून निघणाऱ्या पाण्याने आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे असे स्थानिक रहिवाशी राजेश वैती यांनी सांगितले.
कंपनीतून निघणार्म्या पाण्याला मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी येत असते. तसेच धुरामुळे श्व्सनाचे विकार, खोकला, डोळ्यांची जळजळ आदी तरास होत आहे. रोगाराई पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. हे रसायनयुक्त पाणी छोटय़ा मोठय़ा नाल्यातून शेतात आणि खाडीत जात आहे. यामुळे शेकडो हेक्टर जमीन नापीक झाली आहे. तर पाणवठे दुषित झाले आहेत. हिरव्या, पिवळ्या, निळ्या लाल रागाचे पाणी सर्रास वसईच्या औद्योगिक वसाहतीत नाल्यात पाहायला मिळत आहे. काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारचे पाणी पिवून ७ गाई मेल्याची घटना घडली होती. यावेळी या परिसरातील स्थानिकांनी या कंपन्याच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. पण आजतयागत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक महापालिका प्रसाशन या कंपन्याच्या विरोधात आजही गंभीर नसल्याची तक्रार येथील स्थानिकांनी केली आहे. या कंपन्या कायदा धाब्यावर बसवून रसायनयुक्त पाणी उघडी गटारे, नाले तसेच रस्त्यालगत सोडत आहेत, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. या केमिकल कंपन्यांचा नागरिकांना त्रास होत आहे, अनेकवेळा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही, कंपनीतून निघणाऱ्या पाण्याने आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे असे स्थानिक रहिवाशी राजेश वैती यांनी सांगितले.
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या कंपनीवर आम्ही कारवाई करत आहोत, रसायनयुक्त पाणी हा आमचा विषय नाही तरी तत्सम विभागाला या संदर्भात माहिती दिली जाईल आणि योग्य ती कारवाई होईल.-मनोहर केदारे, आरोग्य विभाग, पालिका
रसायनयुक्त पाण्यावर प्रकिया करूनच कंपन्यांनी ते सोडायचे आहे, तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आम्ही सतत पाहणी करत आहोत. असे प्रकार आढळल्यास नक्की कारवाई केली जाईल.-अमर दुर्गुले, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ