ऑक्टोबरमध्ये जसा दिवाळीचा माहोल सुरू होतो, तसा डिसेंबर महिना म्हटला की सर्वाना नवीन वर्षांचे आणि आठवडाभर आधी येणाऱ्या नाताळचे वेध लागतात. वर्ष संपत आल्याने बहुतेक जण ‘झाले गेले विसरूनी जावे, पुढे पुढे चालावे’ अशा कातर मूडमध्ये असतात. या उत्सवी आणि उत्साही वातावरणासाठी बाजारपेठाही सजलेल्या असतात. निरनिराळ्या रंगीबेरंगी भेटवस्तूंनी दुकाने ओसंडून वाहत असतात. लाल-पांढऱ्या वेषातले सांताक्लॉज ठिकठिकाणी उभे राहून त्यांच्या पोतडीतून चॉकलेटस् आणि खाऊ देत असल्याने त्यांच्याभोवती लहान मुलांचा गराडा असतो. मुंबई-ठाण्यात मॉल संस्कृती आल्यानंतर नाताळच्या या उत्साहात भरच पडली आहे. असेच काहीसे ‘हॅपी गो लकी’ वातावरण सध्या ठाणे परिसरातील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2015 रोजी प्रकाशित
नाताळची नवलाई
या उत्सवी आणि उत्साही वातावरणासाठी बाजारपेठाही सजलेल्या असतात.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-12-2015 at 01:57 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Christmas festival enjoyment