ठाणे : अयोध्या येथे सोमवारी राम मंदिराचे उद्घाटन आणि राम मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्ताने शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मासुंदा तलावाकाठी उभारलेल्या तरंगत्या रंगमंचावर महाआरती केली. राम मंदीर व्हावे असे बाळासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकार केले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

अयोध्या येथे राम मंदिराचे उद्घाटन आणि राम मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी होणार आहे. या सोहळ्यापूर्वी संपूर्ण देशभरात विविध हिंदू संघटना तसेच राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. शनिवारी ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही मासुंदा तलावकाठी महाआरतीचे आणि मिरवणुकीचे आयोजन केले होते. रात्री आठ वाजता एकनाथ शिंदे यांनी कौपिनेश्वर मंदिरात दर्शन घेतले. त्यांनतर त्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Minister Eknath Shindes rally to campaign for Mahayuti candidate Rajshree Patil Mahale
भर उन्हात मुख्यमंत्र्याचे जय श्रीराम, जय हनुमान…
Sunetra pawar, Ajit Pawar,
अजित पवारांनी सपत्निक घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन; सुनेत्रा यांनी देवाला केली ‘ही’ प्रार्थना
shrikant shinde on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांनी माझ्या नावाची घोषणा केली असली तरी…” कल्याणच्या उमेदवारीवरून श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

हेही वाचा – ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडूनही श्रीरामाची मिरवणूक

हेही वाचा – देशाची वाटचाल रामराज्याकडे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन 

या मिरवणुकीत विविध देखाव्यांचा समावेश होता. मासुंदा तलावामध्ये तरंगता रंगमंच उभारण्यात आला होता. या रंगमंचावर श्रीरामाचा वनवास ते राज्याभिषेक याचा लेझर शो दाखविण्यात आला. त्यांनतर एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी लता शिंदे यांनी महाआरती केली. महाआरतीनंतर शिंदे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न मोदी यांनी सकारल्याचे म्हटले. या महाआरतीसाठी शेकडो ठाणेकर उपस्थित होते.