जयेश सामंत

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा सोमवारी म्हणजेच २० मे रोजी पार पडणार आहे. तसंच आणखी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक संपणार आहे तर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. ४०० पारचा दावा एनडीएसह भाजपाने केला आहे. प्रचार शनिवारी थंडावला आहे. मात्र मुलाखती देणं सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसत्ताला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत कल्याण आणि ठाणे या मतदारसंघात आम्ही घवघवीत मताधिक्याने जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच मोदींना जितक्या शिव्या द्याल तितक्या अधिक मतांनी ते निवडून येतील असा टोला विरोधकांना लगावला आहे.

Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!
prashant kishor on Exit poll
Exit Poll यायला काही तासांचा वेळ असताना प्रशांत किशोर यांचं मोठं विधान; म्हणाले, “२०१९ पेक्षा यावेळी…”
Lok Sabha Election Result 2024 NDA vs INDIA Alliance in Marathi
Lok Sabha Election Results: ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ला किती जागा मिळाल्या; काय आहे आकडेवारी?
Maharashtra Exit Poll Result 2024 Live in Marathi
Maharashtra Exit Poll 2024 : फुटीर राजकारणाला जनतेने मतदानातून उत्तर दिलं? काय सांगतात एक्झिट पोल
navi Mumbai lok sabha voting
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान!

ठाण्याच्या जागेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

तुमचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेसाठी भाजपने इतका आग्रह धरणे तुम्हाला पटले का, या प्रश्नावर “एखाद्या जागेवर आग्रह धरणे हा त्यात्या पक्षाचा अधिकार असतो”, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. कोणी कोणत्या जागेसाठी आग्रह धरला हा विषय आता मागे पडला आहे. जागा ठरल्या, उमेदवार ठरला. आता आम्ही एकदिलाने काम करत आहोत. भाजपचे वरिष्ठ नेते गणेश नाईक, त्यांचे पुत्र संजीव आणि संदीप पुर्ण ताकदीने ठाण्याची जागा जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. ‘नरेश म्हस्के माझा जुना कार्यकर्ता आहे’ असे वक्तव्य स्वत: नाईक यांनी केले आहे. ठाणे हा राष्ट्रभक्ती विचारांनी भारलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राष्ट्रभक्तीने प्रेरीत असलेले नागरिक रहातात. रामभाउ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारख्या थोर नेत्यांनी खासदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ठाण्यात कोणी कसलाही प्रचार करो, हा मतदारसंघ आम्ही विक्रमी मतांनी जिंकू”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लगतच असलेल्या कल्याणात श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पावती तेथील मतदार त्यांना देतील. श्रीकांत यांनी केलेल्या कामाचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

हे पण वाचा- “लीन झालेत, आता विलीनही होतील”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; काँग्रेसचा उल्लेख करत म्हणाले…

भगवा नकोसा झालेल्यांना मतदार जागा दाखवतील

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भगवा ध्वज जीव की प्राण होता. पण आज उध्दव ठाकरे यांच्या भाषणातून, प्रचारातून, मिरवणुकांमधून भगवा ध्वज गायब झाला आहे. विशिष्ट समाजाची मते मिळविण्यासाठी त्यांना हिंदुत्व नकोसे झाले आहे. अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रविचाराने प्रेरीत असलेल्या संघटनेवर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तेव्हा आता मुंबई, ठाणेकर त्यांना त्यांची जागा दाखवतील, अशी सणसणीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

“महाराष्ट्रात महायुतीला विरोधक कडवी लढत देत आहेत असे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले गेले. ठराविक वर्ग नाराज असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून केला गेला. राज्यातील काही मतदारसंघात महायुतीला आव्हान आहे असे वातावरण उभे केले गेले. हे कसे खोटे आणि चुकीचे होते याचे उत्तर सर्वांना येत्या चार जून रोजी मिळेलच”, असे मुख्यमंत्री म्हणाले. “ मी दाव्याने सांगतो; राज्यात झालेल्या पाचही टप्प्यांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामागे ठामपणे उभा आहे. मुंबई महानगर पट्टयातही काही वेगळी परिस्थिती नाही. येथेही आम्ही विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर मतदारांपुढे जात आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या किमान ४५ जागा निवडून येतीलच शिवाय मुंबई महानगर पट्टयातील सर्वच्या सर्व १० जागांवर शिवसेना-भाजपला विजय मिळेल”, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.

मोदींना जितक्या शिव्या द्याल तितके ते अधिक जागा मिळवतील

नरेंद्र मोदी यांना शिव्या देण्याचा एकमेव कार्यक्रम विरोधकांपुढे उरला आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदींचा उल्लेख विरोधकांनी ‘मौत का सौदागर’ असा केला. गेल्या निवडणुकीत ‘चौकीदार चोर है’ असे ही मंडळी म्हणत. आता तडीपार वगैरेसारखी खालची भाषा वापरत आहात. एक गोष्ट लक्षात घ्या विरोधक मोदींना जितक्या शिव्या देतील तितके लोकांचे समर्थन त्यांना वाढत जाईल. आधी २०१४, २०१९ मध्ये काय झाले हे विरोधकांनी पाहीले आहेत. यावेळीही मोदी रेकॉर्ड ब्रेक जागांनी निवडणून येतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

विधानसभेच्या जागावाटपाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत राज्यात भाजप हाच मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य केले होते. फडणवीस यांचे वक्तव्य तसेच राज ठाकरे यांनी भाजपला दिलेला पाठिंबा, विधानसभा निवडणुकीत जागा वाटपासंबंधीची समीकरणे यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांवर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अधिक जागा निवडून आणण्याचे एकमेव लक्ष्य आता आमच्यापुढे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. “पुढच्या कोणत्याही गोष्टीचा विचार आमच्या मनाला शिवतही नाही. शिवसेना-भाजप ही २५ वर्षांची जुनी मैत्री आहे. ही नैसर्गिक युती आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी निवडून आणताना महाराष्ट्रातील अधिकाधिक जागांची साथ त्यांना मिळायला हवी या एकमेव विचाराने आम्ही काम करत आहोत,” असे शिंदे म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही समर्थन देत असताना मोदींवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे विधानसभेची समीकरणे काय असतील, कोणाला किती जागा मिळतील असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील; पण आमचे लक्ष्य लोकसभा आहे आणि लक्ष्यभेद आम्ही करणारच असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.