डोंबिवली – मागील १९ वर्षापासून डोंबिवलीकर संस्थेकडून दिवाळी सुट्टीच्या काळात लहान मुलांसाठी येथील गणेशनगर मधील रेल्वे मैदानावर सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन किलबिल मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. हा कार्यक्रम आचारसंहितेचे उल्लंघन करून सुरू असल्याची तक्रार पोलिसांच्या १०० संपर्क क्रमांकावर रविवारी रात्री आठ वाजता करण्यात आली.

ही तक्रार प्राप्त होताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कार्यक्रमस्थळी मुले, पालक यांची मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी तुंडुब गर्दी होती. या गर्दीतून वाट काढत पोलीस मंचापर्यंत पोहचले. आयोजकांची भेट घेऊन या कार्यक्रमाविषयी १०० क्रमांकावर तक्रार प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा >>>निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

हा कार्यक्रम विधासनभा निवडणुकीच्या काळात घेण्यात आला असला तरी या कार्यक्रमाच्या सर्व पूर्वपरवानग्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच घेतल्या आहेत. हा कार्यक्रम राजकीय नाही, असे आयोजकांनी पोलिसांना सांगितले. कार्यक्रमात अचानक पाच ते सहा पोलीस एकदम आल्याने काही वेळ उपस्थितांमध्ये चुळबुळ झाली. हा कार्यक्रम कोणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण येऊन गेले का, असे प्रश्न कार्यक्रम स्थळी आलेले पोलीस उपस्थितांमधील काहींना विचारत होते.

आयोजकांनी डोंबिवलीकर ही सामाजिक संस्था आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम या संस्थेकडून वर्षभर आयोजित केले जातात. पूर्वपरवानग्या घेऊनच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजकांनी पोलिसांना दिली. या कार्यक्रमाविषयीची सर्व खात्री झाल्यावर पोलीस घटनास्थळावरून निघून गेले.

हेही वाचा >>>Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”

हा कार्यक्रम डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी आयोजित केला आहे, असा गैरसमज करून मनोरंजन कार्यक्रमातील गर्दीचा लाभ ते प्रचारासाठी करू शकतात या विचारातून काही राजकीय मंडळींनी मंत्री चव्हाण यांना अडचणीत आणण्यासाठी ही तक्रार केली असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. आचारसंहितेचा विचार करून मंत्री रवींद्र चव्हाणही कार्यक्रम स्थळी आले नव्हते. या तक्रारीनंतर कुरघोड्यांचे राजकारण करणारा एक उमेदवार मात्र किलबिल कार्यक्रम परिसरात पोलीस आल्यामुळे काय गोंधळ सुरू आहे का हे पाहण्यासाठी आपल्या वाहनातून फेरी मारून गेला हे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मंत्री चव्हाण यांना आचारसंहितेच्या नावाने अडचणीत आणण्याची काही राजकीय मंडळींची खेळी होती. पण कार्यक्रम स्थळी मंत्री चव्हाण नसल्याने त्यांचा हिरमोड झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही राजकीय मंडळी गेल्या पाच महिन्यांपासून मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर विविध प्रकारच्या कुरघोड्या करून त्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण सरकार पक्षातील एक जबाबदार मंत्री असल्याने चव्हाण या कुरघोडीच्या राजकारणाला दुर्लक्षित करत असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.