अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहारावरुन सोमवारी कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे येथील मुरबाड रस्त्यावरील स्टेट बँक आणि भारतीय जीवन विमा कार्यालया बाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या निदर्शनांमध्ये काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश काँग्रेस नागरी विकास विभागाचे अध्यक्ष नवीन सिंग, ब्रिजकिशोर दत्त, एकनाथ म्हात्रे, महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा- “वृत्ती, कार्यातून देशाचे हित हीच राष्ट्रभक्ती”; तुषार गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

स्टेट बँक, जीवन विमा योजनेत सामान्य जनतेचा पैसा आहे. हा पैसा अदानी समुहावर केंद्र सरकारकडून उधळला जात असल्याच्या निषेध यावेळी करण्यात आला. अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी निवृत्त न्यायाधिश किंवा संसदीय संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या निदर्शक पदाधिकाऱ्यांनी केल्या. या दोन्ही आस्थापनांमध्ये सामान्य गुंतवणूकदारांचे पैसे आहेत. या गुंतवणुकीला सरकाने आर्थिक संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा- शहरांच्या विकासाबरोबरच रस्ते जोडणी गरजेची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र सरकारच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. अदानी समुहाच्या चौकशी सुरू झाली नाही तर बेमुदत आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा प्रदेश नेते नवीन सिंग यांनी दिला.