भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने बलात्कार आणि धमकीचा आरोप केला असून याप्रकरणी कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. गणेश नाईक यांच्यावर गुन्हे दाखल असून शुक्रवारी जामीन अर्जावरील सुनावणी पार पडली. कोर्ट उद्या याप्रकऱणी निकाल देणार आहे. त्यामुळे गणेश नाईक यांना अटक होणार की सुटका हे पहावं लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात झाली. त्यांनी या प्रकरणाचे अंतिम आदेश २७ एप्रिलला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज सुनावणी पार पडली.

कोर्टात सुनावणीदरम्यान हा गुन्हा दबावाखाली दाखल झाला असल्याचा युक्तीवाद गणेश नाईक यांच्या वकिलांमार्फत करण्यात आला. तर गणेश नाईक यांचा ताबा आवश्यक आहे, त्यांच्या गुन्हांचे स्वरूप गंभीर आहे असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश ब्रह्मे यांनी या प्रकरणाचा निकाल उद्या देणार असल्याचं सांगितलं आहे.

नाईक यांच्याविरोधात एका महिलेने धमकी आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर धमकी प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात, तर लैंगिक अत्याचार प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांत अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी नाईक यांनी ठाणे न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी दोन अर्ज केले होते. यातील धमकी प्रकरणातील अर्जावर २७ एप्रिलला अंतिम सुनावणी घेणार असल्याचा निर्णय झाला होता. तर, लैंगिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या न्यायालयात झाली होती.

न्यायाधीश व्ही. वाय जाधव यांनी हे प्रकरण दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करण्याकरिता मुख्य न्यायाधीशांकडे पत्र पाठवलं आहे. मुख्य न्यायाधीशांनी शुक्रवारी हे प्रकरण एकाच न्यायाधीशांसमोर ठेवण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी लैंगिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात झाली. जामीन अर्जावरील सुनावणी ही २७ एप्रिलला घेण्याचा निर्णय राजेश गुप्ता यांनी घेतला आहे, अशी माहिती पीडित महिलेचे वकील अजय वरेकर यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court to pronouce verdict on rape and threatening case over bjp mla ganesh naik sgy
First published on: 27-04-2022 at 17:47 IST