कल्याण– येथील पूर्व भागातील पुणे लिंक रस्त्यावरील विजयनगर भागात एका विकासकाने गृहप्रकल्प उभारणीच्या कामासाठी अडथळा ठरणारी झाडे परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमींच्या निदर्शनास येणार नाहीत अशा पध्दतीने तोडण्यास सुरूवात केली आहे, अशी तक्रार पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली आहे.

विजयनगर भागात जुनाट बोरी, बाभळी आणि इतर झाडे आहेत. ही झाडे असलेल्या भागात एका विकासकाचा गृह प्रकल्प प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या चारही बाजुने पत्रे लावण्यात आले आहेत. या गृह प्रकल्पाच्या आतील भागातील झाडे तोडण्यास कल्याण डोंबिवली पालिका परवानगी देत नाही. तोपर्यंत विकासकाला झाडे तोडता येणार नाहीत, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. पालिकेची परवानगी मिळणे मुश्किल आणि अनेक अटीशर्तींचे पालन करावे लागत असल्याने विकासकाच्या कामगारांनी पालिका, नागरिक, पर्यावरणप्रेमींना अंधारात ठेऊन बेमालुमपणे झाडे तोडली आहेत, असे रहिवाशांनी सांगितले. कल्याण पूर्व भागात आता ठराविक भागात झाडे शिल्लक आहेत. ती तोडून टाकण्यात आली तर पूर्व भागाचा हरितपट्टा नष्ट होईल, अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

Residents of Santacruz and Khar, Residents of Santacruz and Khar Oppose bmc's Elevated Route, BMC Administration to Study Citizens Instructions, Santacruz, Khar, khar subway, Santacruz news, khar news, Santacruz Khar Elevated Route,
खार सब वेवरील उन्नत मार्ग प्रकल्प रद्द होणार ? नागरिकांच्या सूचनांचा प्रशासन अभ्यास करणार
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित

हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत तीन दिवसात फटाक्यांचा १४ टन कचरा जमा

कल्याण पूर्व भागात अद्याप झाडे तोडण्यास कोणालाही परवानगी दिली नाही. नियमबाह्यपणे कोणी विकासक झाडे तोडत असेल तर त्या जागेची पाहणी केली जाईल. ती झाडे परवानगी न घेता तोडली असतील तर संबंधित विकासकावर कारवाई केली जाईल, असे पालिका प्रशासनाक़डून सांगण्यात आले.

(कल्याण पूर्वेत गृहप्रकल्पासाठी झाडांची तोड.)