ठाणे : शहापूर तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोसिम मुर्तुजा शेख (३७) यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. उपसरपंच यांनी घरपट्टी नावावर करून देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे तक्रारदाराने केली होती.

तक्रारदार यांनी खर्डी येथे घर खरेदी केले असून या घराची घरपट्टी नावावर करून देण्यासाठी खर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोसिम शेख यांनी त्यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने सापळा रचून ठाणे लाचलुचपत विभागाने खर्डीचे उपसरपंच मोसिम शेख याला ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून पुढील कारवाई सुरू आहे.