डोंबिवली- येथील डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे सचिव सुभाष मुंदडा यांचे रविवारी येथे निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अलीकडेच त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते.

सुभाष मुंदडा टेक्सटाईल इंजिनिअर होते. डोंबिवली ग्रंथसंग्रहालयात ते मागील अनेक वर्षापासून कार्यरत होते. ग्रंथसंग्रहालयाचे प्रशासन, ग्रंथसंपदा नियोजन आणि अर्थकारण हे काम ते बारकाईने आणि तळमळीने करत होते. दर महिन्याला डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचा एक तरी साहित्यविषयक कार्यक्रम झाला पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता.

हेही वाचा >>>ठाण्यातील भाजपा-शिंदे गट वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जम्मू-काश्मीरमधून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मला वाचनाची आवड नसली तरी साहित्यसेवा करण्याची खूप आवड आहे, असे ते नेहमी म्हणत. डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाची अभ्यासिका, वाचनकक्षाच्या नुतनीकरणात त्यांचा मोलाचा वाटा होता. ग्रंथसेवेतील उत्तम कामगिरीबद्दल त्यांना नागरी अभिवादन समितीतर्फे सन्मानित करण्यात आले होते. शहरातील अनेक साहित्य संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.सुभाष मुंदडा डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे आधारस्तंभ होते. ग्रंथालय क्षेत्रात तळमळीने काम करणारा कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सुरेश देशपांडे यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(सुभाष मुंदडा)