कल्याण- रेल्वे स्थानकातील फलाटावर रिक्षा चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे हे माहिती असुनही आंबिवलीतील एका बेशिस्त रिक्षा चालकाने सोमवारी रेल्वे सुरक्षा जवानांच्या नकळत थेट फलाटावर रिक्षा आणून प्रवासी वाहतूक केली होती. या रिक्षा चालकाच्या या कृती बद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या बेशिस्त रिक्षा चालकाला रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेऊन मंगळवारी अटक केली.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
Pune-Daund suburban service,
रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल

हेही वाचा : प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वैगरे नसतो; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला टोला

संजय पारधी असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याचावर रेल्वे सुरक्षा कायद्याने टिटवाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर रेल्वे सुरक्षा बळाने स्वतंत्र कायदेशीर कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती टिटवाळा रेल्वे सुरक्षा बळाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली बाबर यांनी दिली.

आंबिवली रेल्वे स्थानकात एक रिक्षा चालक सोमवारी आपली रिक्षा घेऊन थेट फलाटावर आला. रिक्षेला वळण घेण्यासाठी जागा नसताना त्याने नामफलकाच्या कोपऱ्यातून रिक्षा वळवून थेट फलाटाच्या बाहेर रिक्षा काढली. फलाटावर रिक्षा नेऊ नकोस असे सांगुनही चालकाने प्रवाशांचे ऐकले नाही. चालकाच्या या उद्दामपणामुळे प्रवाशांनी रिक्षेतून उतरणे पसंत केले होते. या सगळ्या प्रकाराची दृश्यचित्रफित सोमवारी सकाळी समाज माध्यमांवर प्रसारित झाली. चालकाच्या या बेशिस्तीची रेल्वेच्या वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली. अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या वरिष्ठांना ही चित्रफित पाठवून बेजबाबदार चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली.

सुरक्षा बळाच्या वरिष्ठ अधिकारी अंजली बाबर यांनी आंबिवली रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱे तपासून त्या माध्यमातून फलाटावर आलेल्या रिक्षा चालकाचा वाहन क्रमांक शोधला. त्या आधारे पोलिसांनी चालकाला आंबिवली भागातून अटक केली. त्याच्यावर सुरक्षा जवानांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

या रिक्षा चालकाची रिक्षा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तपासणीसाठी येईल, त्यावेळी त्याच्यावर बेशिस्तपणा बद्दल कारवाई केली जाईल, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. या बेशिस्त रिक्षा चालकाला अटक केल्याबद्दल रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोणत्याही रिक्षा चालकाची बेशिस्त संघटना खपवून घेणार नाही, असे रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.