लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी, त्यांची प्रकृती पुर्णपणे बरी झालेली नाही. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेतली असून यामुळे त्यांच्या सर्वच बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्यात महायुतीला बहुमत मि‌ळाले असले तरी आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री ठरू शकलेला नाही. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. एकीकडे राज्यातील सरकार स्थापनेवरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असतानाच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत मालमत्ता कर थकविणाऱ्या क्रिटीकल केअर सेंटरसह पाच गाळे सील, पालिकेच्या ग प्रभागाची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या धावपळीमुळे आरास करण्यासाठी शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडली होती. याबाबतची माहीती खुद्द शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली होती. ‘विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दररोज ८ ते १० सभा करत असल्याने प्रचंड धावपळ झाली होती. यातून थोडासा आराम करण्यासाठी दरे मुक्कामी आलो असून आपली प्रकृती थोडी खराब होती. मात्र आता आपली प्रकृती ठीक आहे’ असे त्यांनी सांगितले होते. दरे गावात विश्रांती घेतल्यानंतर रविवारी ते ठाण्यातील निवासस्थानी परतले. सोमवारी ते पुन्हा पक्ष आणि महायुतीच्या बैठकांमध्ये सक्रीय होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सोमवारीही त्यांची प्रकृती ठिक नव्हती. यामुळे त्यांनी दिवसभरातील बैठका रद्द करून घरीच विश्रांती घेतली.