scorecardresearch

ठाण्यात मराठी परिभाषा शब्दकोश प्रदर्शन ; नागरिकांचा प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे महापालिका पुरस्कत व उत्सव ७५ ठाणे अंतर्गत आयोजित केलेल्या मराठी परिभाषा कोश प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

ठाण्यात मराठी परिभाषा शब्दकोश प्रदर्शन ; नागरिकांचा प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
( विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले )

शब्दकोशामुळे मूळ शब्द व त्याचा अर्थ समजण्यास मदत होते, शब्दकोशामध्ये सामान्यतः शब्द, त्याचा अर्थ त्या शब्दाचा प्रतिशब्द, तसेच इष्ट तेथे अर्थाचे अधिक विशदीकरण दिलेले असते. सर्वच विषयांचा आणि त्याचप्रमाणे विविध वाङ्मयांचा अभ्यास करण्यासाठी शब्दकोश महत्वाचे आहे, असे मत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी व्यक्त केले.

ठाणे महापालिका पुरस्कत व उत्सव ७५ ठाणे अंतर्गत आयोजित केलेल्या मराठी परिभाषा कोश प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १२ व १३ ऑगस्ट रोजी विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषेतील ४०० शब्ब्दकोशांचा समावेश आहे . २० खंडांमध्ये असलेली ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी ,मोलसवर्थचा शब्दकोश, ऑक्सफर्ड ने ६०खंडामध्ये प्रकाशित केलेला चरित्रात्मक शब्दकोश पाल्ग्रेव्ह चा अर्थशास्त्र शब्दकोश, संज्ञा संकल्पना कोष त्याचप्रमाणे विविध विषयासाठी असलेले शब्दकोश, महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले सर्व परिभाषा कोष, शासन व्यवहारकोश इत्यादी महत्वपूर्ण शब्दकोश या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा सुभाष शिंदे,डॉ महेश पाटील, डॉ प्रियंवदा टोकेकर, हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव समितीचे समन्वयक डॉ दीपक साबळे ,सर्व विभाग प्रमुख, सर्व ग्रंथालय कर्मचारीआणि ग्रंथालय शास्त्राचे विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथपाल नारायण बारसे यांनी प्रदर्शनाची भूमिका विशद करून सर्वांचे स्वागत केले . दोन दिवस सुरू असलेल्या या मराठी परिभाषा शब्दकोश प्रदर्शनास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Exhibition of marathi definition dictionary in thane amy

ताज्या बातम्या