आपण रेल्वे मध्ये लोको पायलट आहोत. आपली रेल्वेत खूप ओळख आहे. असे दाखवून एका तोतया लोको पायलटने कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात राहत असलेल्या महिलेला रेल्वेत नोकरी लावतो सांगून २१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, एका आरोपीला अटक केली आहे. तोतया लोको पायलटच्या इतर दोन फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमाशंकर वर्मा असे तोतया लोको पायलट आरोपीचे नाव आहे. तो उत्तराखंडचा मूळ रहिवासी आहे. उमाशंकरने एक्सप्रेस चालवत असल्याची एक दृश्यचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. या दृश्यचित्रफितीच्या माध्यमातून तो लोकांना आपण रेल्वेत लोको पायलट (एक्सप्रेस इंजिन चालविणारा चालक) आहोत असे दाखवित होता. या दृश्यचित्रफितीच्या खाली आपण बेरोजगारांना रेल्वेत नोकरी लावण्याचे काम करतो असे म्हटले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake loco pilot cheated woman in kalyan by promising job in railways zws
First published on: 09-11-2022 at 10:32 IST