बदलापूर रेल्वे स्थानकातील होम फलाटचे काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद होते. होम फलाटाच्या कामाचे भूमिपूजन ३ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. आजतागायत हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. याबाबतचे वृत्त लोकसत्तामध्ये प्रकाशित करण्यात आले होते. या बातमीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने काम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात नुकतीच कुळगाव बदलापूर नगर पालिका मुख्यालयात एक बैठक पार पडली. यात रिक्षात थांब्याची एक रांग कमी करून त्या जागी होम फलाटाचे काम सुरू करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या गर्दीला विभागण्यासाठी आणि अरुंद फलाटांवरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात होम फलाटाला मंजुरी दिली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी या होम फलाटाचे घाईघाईने भूमिपूजन करण्यात आले. मात्र त्याचे काम सुरू होण्यात मोठा अवधी गेला. तीन वर्षांपासून सुरू असलेले फलाटाचे हे काम विविध कारणांमुळे रखडले होते. सुरुवातीच्या काळात पुनर्वसन आणि जागेच्या विषयांवरून स्थानिक व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावर तोडगा काढून झाल्यानंतर या होम फलाटाचे काम सुरू करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम पुन्हा पूर्णतः ठप्प झाले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally work on the home platform of badlapur begins abn
First published on: 28-02-2022 at 14:49 IST