scorecardresearch

ठाणे : आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०३-फायर वाहन व ०१-रेस्क्यू वाहन व ०१-वॉटर टँकरसह, ०१- जंबो वॉटर टँकरला पाचारण केले आहे.

ठाणे : आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका
नौपाडा येथील तीन मजली इमारतीमध्ये आग

नौपाडा येथील सेंट जॉन शाळे समोर गुरूप्रेरणा या तीन मजली इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १३ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत त्यांची सुखरूप सुटका केली. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांचे मार्फत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०३-फायर वाहन व ०१-रेस्क्यू वाहन व ०१-वॉटर टँकरसह, ०१- जंबो वॉटर टँकरला पाचारण केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 10:56 IST