मीरा रोड येथील ब्रँड फॅक्टरीच्या इमारतीला मध्यरात्री शॉक सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. यात चार तासाहून अधिक काळ बचावकार्य राबवून अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतीही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा- ठाण्यात भाजपाने साजरा केला उत्तर प्रदेश स्थापना दिवस, शहरातील चार ठिकाणी पार पडला कार्यक्रम

मीरा रोड येथील हाटकेश परिसरात असलेल्या ब्रँड फॅक्टरीच्या सहाव्या मजल्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची तीव्रता इतकी अधिक होती की काही क्षणातच ही आग सातव्या मजल्यावर पोहचली. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. १ टीटीएल वाहन ,२ वॉटर टँकर,७ मिनी वॉटर टेंडर आणि तब्बल ५७ जवानांच्या मदतीने चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. महत्वाची बाब म्हणजे आगीत सातव्या मजल्यावर अडकलेल्या तीन कर्मचाऱ्यांसाठी बचावकार्य राबवल्यामुळे जीवितहानी टळली. मात्र आगीत ब्रँड फॅक्टरीमधील विविध साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक स्वरूपात मिळालेल्या माहितीनुसार शॉक सर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.