ठाणे : शिळफाटा येथे सोमवारी दुपारी १३ गोदामांना आग लागल्याची घटना उघडकीस आली. गोदामांमध्ये प्लास्टिक, रबरच्याही वस्तू आहे. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाकडून आग विजविण्याचे कार्य सुरू होते. या घटनेत कोणालाही दुखापत झाले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
शिळफाटा येथील भट्टी गल्ली परिसरात गोदामांना लाग लागल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग विजविण्याचा प्रयत्न केला. परंतु गोदाम एकमेकांवर लागून असल्याने आग वाढत होते. त्यामुळे परिसरातील एकूण १३ गोदामांमध्ये ही आग पसरली. अनेक गोदामांमध्ये प्लास्टिक, रबरच्या वस्तू होत्या. त्यामुळे आग विजविण्यास अडचणी येत होत्या. रात्री उशीरापर्यंत आग विजविण्याचे कार्य प्रशासनाकडून सुरू होते.