ठाणे : पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी रेल्वे पुलावर मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी सातपैकी चार तुळया बसविल्या. उर्वरित तीन तुळया सोमवारी पहाटेपर्यंत बसवून पूर्ण होणार आहेत. या कामासाठी १ हजार २०० टन वजन उचलण्याची क्षमता असलेल्या क्रेनचा वापर करण्यात आला. देशात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला होता, अशी माहिती अभियंत्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी रेल्वे पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे त्याच्या रुंदीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. एमएमआरडीएने कोपरी पुलाजवळील भुयारी मार्गावर तुळया बसविल्यानंतर मध्य रेल्वेलाही या ठिकाणी तुळया बसवाव्या लागणार होत्या. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी रात्री या ठिकाणी मध्य रेल्वे प्रशासनाकडून सात लोखंडी तुळया बसविण्याचे काम हाती घेण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four out of seven beams installed on the kopari railway bridge zws
First published on: 25-01-2021 at 01:08 IST