लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: विदेशात शिक्षणासाठी जाण्याची तयारी करणाऱ्या डोंबिवलीतील आयरे भागात राहत असलेल्या एका तरुणीची कांदिवली येथील विदेश सेवा देणाऱ्या खासगी एजन्सीने ३२ लाख ४४ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. जेनिषा बिपीन पाटील अशी फसवणूक झालेल्या तरूणीचे नाव आहे. ती आयरे रस्ता भागातील शांतीवन भागात राहते. या मुलीची आई रिध्दी पाटील यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करून घेतला.

Mahavitaran Employee, Fatally Attacked, High Electricity Bill, Inquiry, murder in pune, murder in baramati, Mahavitaran Employee attacked, Mahavitaran Employee murder, barmati news, marathi news, pune news, mahavitaran news, police,
बारामती : महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याचा कोयत्याने १६ वार करून खून, विजेचे बिल जास्त आल्याने ग्राहकाकडून हल्ला
Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
nashik district apmc auction stopped
आजपासून नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव बंद; हमाली, तोलाई वाद

माझी करिअर्स ॲन्ड ऑप्शन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश मेहता, व्यवस्थापकीय संचालक स्टेला राकेश मेहता अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे कार्यालय मुंबईतील कांदिवली येथील चारकोप, सेक्टर आठ, एस-१, साईप्रेम सोसायटीत आहे. फेब्रुवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीतील आयरेतील गावदेवी मंदिरात दोन गटात राडा

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार रिध्दी पाटील यांची मुलगी जेनिषा ही इंग्लडमधील लकेस्टर विद्यापीठात, पेस विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार होती. या विद्यापीठात भारतामधून जाण्यासाठी करावयाच्या अत्यावश्यक प्रक्रिया आणि विदेशातील विद्यापीठात जाईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची हमी माझा करिअसर्स एजन्सीने स्वीकारली होती.

कोणतीही धावपळ न करता एजन्सीच्या मार्फत काम होते म्हणून पाटील कुटुंबीयांनी या एजन्सीच्या संचालकांवर विश्वास ठेऊन त्यांनी १२ लाख ९८ हजार, १९ लाख ४५ हजार रूपये असे एकूण ३२ लाख रूपये एजन्सीने केलेल्या सूचनांप्रमाणे त्यांच्या बँक खात्यावर जमा केले. ९० दिवसांच्या कालावधीत जेनिषाच्या विदेशातील प्रवेश आणि परेदश प्रवासाच्या प्रक्रिया पूर्ण करून सर्व कागदपत्रे आपल्या ताब्यात देण्यात येतील, असे आश्वासन संचालकांनी दिले होते. परंतु, विदेशात जाण्याची वेळ जवळ आली. ९० दिवसांचा कालावधी संपुनही माझा करिअर्स एजन्सीने विहित वेळेत कागदपत्रे पाटील यांना दिली नाहीत. याबाबत रिध्दी पाटील यांनी एजन्सी संचालकांना यासंदर्भात विचारणा केली तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसे परत करण्यास ते तयार नाहीत.

आणखी वाचा-ठाकुर्लीतील हनुमान मंदिराजवळील रस्ता पेव्हर ब्लॉक कामासाठी पंधरा दिवस बंद

मुलीच्या शिक्षणाचे विदेश दौऱ्याचे नियोजन एजन्सीने विस्कळीत केले. तसेच भरणा केलेली रक्कम एजन्सी चालक परत करण्यास तयार नाहीत. त्यामुळे पाटील कुटुंबीयांनी माझा करिअर संस्थेच्या संचालकांविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक जी. आर. जाधव तपास करत आहेत.