ठाणे तसेच मुलुंड भागात काही ठिकाणी बोगस काॅल सेंटर चालू असून या माध्यमातून परदेशी नागरिकांची ॲानलाईन मार्फत फसवणूक केली जात आहे, अशी माहिती पोलीसांना सूत्रांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी या बोगस काॅल सेंटरवर शनिवारी मध्यरात्री धडक देवून कारवाई केली आणि काॅल सेंटर चालविणाऱ्या १३ पूरुष आणि तीन महिलांना अटक करण्यात आले.

हेही वाचा >>> डोंबिवली : भोपर गावातील घर जळीतामधील महिला आणि तिच्या मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न ; महिलेचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वागळे इस्टेट पोलीस स्टेशन हद्दीतील जयदीप इन्फोसेस बिल्डींग, सेट्रम ऑफिस समोर, मुलुंड चेक नाका, ठाणे येथील आर. एन. सोल्युशन तिसरा माळा रूम नं ३०२ आणि ४ था माळा रूम नं ४२४ या ठिकाणी बोगस कॉल सेंटर चालू आहे. तेथून परदेशी नागरिकांशी ऑनलाईन संपर्क साधुन त्यांची फसवणुक केली जात आहे, अशी बातमी पोलीसांना शुक्रवारी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी या काॅल सेंटरवर धडक देवून कारवाई केली. या कारवाईतसिध्देश सुधीर भाईडकर (३३), सानिया राकेश जैयस्वाल (२६) यांच्यासह १३ पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी अटक केले. तसेच गुन्हा करण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक साधनही ताब्यात घेण्यात आले. यांच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात ०१ अल्पवयीन मुलगा देखील सहभागी असल्याने त्यास कायदेशीर प्रक्रीयेनंतर पालकांचे ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पोलीसांकडून पुढील तपास सुरु आहे.