लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड ते आमदार गणपत गायकवाड उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात सामोपचाराच्या बैठकीसाठी येत असल्याचे संपूर्ण सीसीटीव्ही चित्रण समाज माध्यमांत प्रसारित झाले आहे. त्यामुळे या घटनेची वस्तुस्थितीदर्शक माहिती पुढे आली आहे.

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

व्दारली येथे घटनास्थळी जमिनीच्या वादानंतर आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा पहिले हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्या विरूद्ध तक्रार दाखल करण्यासाठी आला. त्यानंतर पाठोपाठ महेश गायकवाड यांचे हिललाईन पोलीस ठाण्यात आगमन झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी महेश यांच्यासह त्यांच्या तीन समर्थकांना दालनात बसण्याची व्यवस्था केली. व्दारली येथील जमीन वादाच्या विषयावर पडदा टाकण्यासाठी सामोपचाराच्या बैठकीसाठी आमदार गणपत गायकवाड येत असल्याने त्यांची आसन व्यवस्था वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या खुर्चीच्या बाजूला करण्यात आली, असे सीसीटीव्ही चित्रणात स्पष्ट दिसत आहे.

आणखी वाचा-प्रेमसंबंधातून टिटवाळ्यातील तरूणाचे अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न

आपला मुलगा वैभव व्दारली येथे गेला होता. तेथे त्याला महेश गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी विरोध केला. म्हणून मुलगा वैभव हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला आहे याची माहिती आमदार गायकवाड यांना समजली. आमदार गायकवाड यावेळी कल्याण पूर्वेतील एका महोत्सवी कार्यक्रमात होते. तेथून ते थेट हिललाईन पोलीस ठाण्यात स्वसंरक्षणात सामोपचाराच्या बैठकीसाठी दाखल झाले. सोबत त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक हर्षल केणे होते.

आणखी वाचा-फलकबाजीमुळे डोंबिवली शहराचे विद्रुपीकरण, रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांकडून कचरा

आमदार गायकवाड यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जगताप यांच्या दालनात आगमन होऊन ते वरिष्ठांच्या खुर्चीच्या बाजूला शहरप्रमुख गायकवाड यांच्या समोरील आसनावर बसले. या कालावधीत दालनाच्या बाहेर आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव याला महेशचे कार्यकर्ते धक्काबुक्की करत होते. महेश, आमदार गायकवाड यांचे गट एकमेकांना धक्काबुक्की करत होते. हा सगळा प्रकार दालनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दर्शकातून दोघेही पाहत होते.

आठ ते दहा मिनिटे आमदार समर्थक दालनातून आत बाहेर करत होते. दालनाबाहेर महेश यांचे कार्यकर्ते आक्रमक होते. आमदारांनी बसल्या जागी तीन वेळ हालचाल केली. चौथ्या वेळी त्यांनी महेश यांच्यावर निशाणा साधून त्यांना लक्ष्य केले, असे चित्रणात दिसत आहे.