लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली शहराच्या मुख्य वर्दळींच्या रस्त्यावर कार्यक्रमांची प्रसिद्धी करणाऱ्या कमानी, शहरांच्या कोपऱ्यांवर फलक लावून काही संस्थांनी शहराचे विद्रुपीकरण केले आहे. या फलकांवर पालिकेकडून कारवाई होत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
North East Mumbai Lok Sabha Constituency Citizens Health Issue
आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला
private bus fare mumbai to konkan marathi news, mumbai to konkan private bus marathi news
मुंबईस्थित कोकणवासीय शिमग्यानिमित्त गावी रवाना, खासगी बस कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारणी
Plaster collapsed Seawoods
नवी मुंबई : पाण्याच्या टाकीचे प्लास्टर कोसळले, नव्या इमारतींच्या ब्लास्टिंगमुळे रहिवासी चिंतेत, पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

डोंबिवली शहरातील फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, मानपाडा रस्ता हे वर्दळीचे भाग आहेत. त्यामुळे याठिकाणी विविध संस्था, राजकीय मंडळींचे फलक सातत्याने लावण्यात येऊन शहराचे विद्रुपीकरण केले जाते. स्कायवॉकच्या कमानीला सतत फलक लोंबकळत असतात. यामधील अनेक फलकांचे जाहिरात शुल्क पालिकेकडे संबंधितांकडून भरणा केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. काही फलक हे राजकीय आहेत. त्यांच्यावर कारवाई केली तर स्थानिक पदाधिकारी फलक काढणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याला फैलावर घेतो. या अनुभवामुळे पालिका कर्मचारी या फलकांकडे पाहण्या व्यतिरिक्त भूमिका घेत नसल्याचे समजते.

आणखी वाचा-ठाण्यात ‘ग्रँड सेंट्रल पार्क’ ची उभारणी; काश्मीरच्या मुघल गार्डनसह चिनी, मोरोक्कन, जपानी संकल्पनेवर उद्याने

शहर स्वच्छ, सुंदर दिसण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. दुसरीकडे शहरात फलकबाजी करणाऱ्या मंडळींची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. डोंबिवली पश्चिमेत दिनदयाळ चौक, फुले चौक, जुने विष्णुनगर पोलीस ठाणे, कोपर पूल भागात सतत फलक लावून काही संस्था, राजकीय मंडळी शहराचे विद्रुपीकरण करत आहेत.

शहराचे विद्रुपीकरण करणार नाही, अशी हमी विविध राजकीय पक्षांनी उच्च न्यायालयात देऊनही त्यांचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर डोंबिवलीत फलकबाजी करून विद्रुपीकरण करत आहेत. शहर विद्रुप करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पुढाकार घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.

आणखी वाचा-बंदुकीचे सर्वाधिक परवाने ठाणे आणि कल्याण, डोंबिवलीत; बंदूक स्वसंरक्षणासाठी की खोट्या प्रतिष्ठेसाठी ?

फेरीवाले कचरा

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात फेरीवाले रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करतात. टाकाऊ कचरा रस्त्यावर फेकून निघून जातात. यामुळे पहाटे रेल्वे स्थानक भागातून जाणाऱ्या प्रवाशांना कचरा तुडवत रेल्वे स्थानकात, किंवा या भागातून येजा करावी लागते. रेल्वे स्थानक भागात कचरा करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी साहाय्यक आयुक्तांनी पुढाकार घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.