कल्याण – येथील मोहने भागातील एका रहिवाशाच्या घरात दिवसाढवळ्या येऊन कुटुंबातील सदस्यांची नजर चुकून अज्ञात व्यक्तिने नऊ लाख ९४ हजार रुपये किमतीच्या ३५ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश कान्हू पाटील (६३, रा. राधा गोविंद सोसायटी, मोहने, कल्याण) असे तक्रारदाराचे नाव आहे. सुरेश पाटील यांच्या घरात गुरुवारी दुपारी एक ते दुपारी तीनच्या दरम्यान अज्ञात व्यक्तिने प्रवेश करून कुटुंबातील सदस्यांची नजर चुकवून घरातील कपाटात ठेवलेले पत्नी आणि मुलीचे ३५ तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरून नेले आहेत. उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून हा प्रकार घडला आहे.
हेही वाचा – बुलाढाणा : पळशी खुर्द येथे वीज पडून ८ बकऱ्या ठार, खामगाव तालुक्यात पावसाची अवकाळी हजेरी
खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी सुरेश यांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून तपास सुरू केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. गायकवाड तपास करत आहेत.