Gutkha worth five and a half lakh rupees seized Bhiwandi Filed case in the police station thane news ysh 95 | Loksatta

भिवंडीत साडे पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त

भिवंडी येथील कशेळी टोलनाक्याजवळ मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाने ५ लाख ६३ हजार ८५० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

भिवंडीत साडे पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

ठाणे: भिवंडी येथील कशेळी टोलनाक्याजवळ मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाने ५ लाख ६३ हजार ८५० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी साहील मणीयार (३३)  आणि मोहम्मद शेख (४६) या दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

कशेळी येथील टोलनाक्याजवळ गुटखा आणला जाणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने नारपोली पोलिसांच्या मदतीने मंगळवारी दुपारी १२ वाजता सापळा रचून एक टेम्पो अडविला. त्यावेळी टेम्पोमध्ये ५ लाख ६३ हजार ८५० रुपयांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी टेम्पोतील साहील आणि मोहम्मद या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 15:32 IST
Next Story
ठाणे जिल्ह्यात कुणबी सेना पुन्हा एकदा सक्रिय ?