ठाणे : घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील ७०० मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे. आज, शुक्रवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. ६ जून पर्यंत ही प्रवेशबंदी असेल. या मार्गावरून हलक्या वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होते. या दुरुस्ती कामांमुळे ठाणे, घोडबंदर आणि मुंबई अहमदाबाद मार्गावर मोठी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई, गुजरात, भिवंडी आणि उरण येथील जेएनपीटी बंदरातून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गे होते. या मार्गावरून मुंबई, वसई, विरार, भाईंदर भागातून वाहतुक करणाऱ्या हलक्या वाहनांचे प्रमाणही अधिक आहे. राज्य परिवहन सेवा (एसटी) तसेच महापालिकांच्या परिवहन विभागाच्या बसगाड्या देखील येथून वाहतुक करतात. घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात मोठ्याप्रमाणत खड्डे पडत असतात. त्यामुळे कोंडी होऊन त्याचा फटका वाहन चालकांना बसत असतो.

हेही वाचा >>> Dombivli MIDC Blast: डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू, ४८ जखमी, मृतांची संख्या वाढण्याची भीती

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला होता. अखेर शुक्रवारपासून या कामास सुरूवात होणार आहे. या कामाच्या कालावधीत कोंडीची शक्यता असल्याने अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. येथील अवजड वाहनांची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली आहे.

पावसाळ्यात पाणी साचल्यास कोंडी आणखी वाढण्याची शक्यता

अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी असली तरी हलक्या वाहनांची वाहतुक मार्गावरून सुरू राहील. दुरुस्ती दरम्यान येथील वाहतूक एकेरी पद्धतीने सोडली जाण्याची शक्यता आहे. घोडबंदर घाट मार्ग अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे एकाचवेळी वाहनांचा भार वाढल्यास ठाणे, घोडबंदर आणि मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहनांच्या रांगा लागू शकतात. पावसाळ्यात पाणी साचल्यास कोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे

घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडतात. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे कोंडी होऊ नये यासाठी ही दुरुस्ती केली जाणार आहे. एका यंत्राद्वारे ७०० मीटर रस्त्यावर खड्डे खणून तेथे नव्याने खडी टाकली जाणार आहे. त्यानंतर येथे डांबरीकरण केले जाणार आहे. येथील मार्गिका समांतर करण्याचा निर्णय देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. परंतु पावसामुळे हे काम लांबणीवर गेले आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील बफर झोन बेकायदा इमल्यांनी नष्ट; निवास आणि औद्योगिक क्षेत्र सीमारेषा नसल्याने एकत्र

अवजड वाहनांसाठी वाहतुक बदल (कालावधी २४ मे ते ६ जून)

१) ) मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना कापूरबावडी चौक आणि माजिवडाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे जातील. किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे जातील.

२) मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद असेल. येथील वाहने खारेगाव खाडी पूलाखालून खारेगाव टोलनाका, मानकोली मार्गे वाहतुक करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३) नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद असेल. येथील वाहने मानकोली पूलाखालून उजवीकडे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे जातील. ४) गुजरात येथून घोडबंदर मार्गे ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद असेल. येथील वाहने चिंचोटी नाका येथून कामन, अंजुरफाटा मानकोली, भिवंडी मार्गे जातील.