लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: येथील पश्चिमेतील खडकपाडा भागात एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आठ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
सुधीर भोईर असे तक्रारदाराचे नाव आहे. ते भोईरवाडी भागात राहतात. शुक्रवार, शनिवार ते घर बंद करुन मुरबाड येथील शेतघरावर पर्यटनासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील आठ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम यांचा ऐवजामध्ये समावेश आहे.
आणखी वाचा-कल्याण मधील निवृत्त तिकीट तपासणीसाची शहापूरमध्ये हत्या
खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी सुधीर भोईर यांनी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.