कल्याण: कल्याण मधील उपप्रादेशिक परिवहन भागातील सर्वोदय हाईट्स इमारतीमधील एका घरात मंगळवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती होऊन आग लागली. या घरातील सहा जणांना मुंबई पोलीस दलातील एका पोलिसाने तत्परता दाखवून घराबाहेर काढले. त्यामुळे सहा सदस्य थोडक्यात बचावले. सहा जणांमध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगीची झळ लागल्याने घरातील दोन महिलांना आगीची झळ लागली आहे. त्यांना नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळ सुखरुप आहे. सर्वोदय हाईट्समधील कौर कुुटुंबीयांच्या घरात मंगळवारी रात्री गॅस गळती होऊन आग लागली. कुटुंबीयांनी बचावासाठी खिडकीतून धावा सुरू केला. मुंबई पोलीस दलातील फोर्स वन जवान दीपक घरत हे आपल्या मुलाला दुचाकीवरुन घेऊन त्या भागातून घरी चालले होते. त्यांना सर्वोदय हाईट्समधील एका घरात आग लागून सदस्य बचावासाठी धावा करत असल्याचे दिसले. त्यांनी दुचाकी थांबवून मुलाला दुचाकीवर बसवून ठेवले.

हेही वाचा >>> ठाणे: नवीन कळवा पुलावरील आणखी एक मार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार

धाव घेत सर्वोदय हाईटसच्या देखभालीसाठी इमारतीच्या चारही बाजुने बांधून ठेवलेल्या परांचीवरुन आग लागलेल्या घराच्या दिशेने चढण्यास सुरुवात केली. आग लागलेल्या घराच्या ठिकाणी प्रत्येक सदस्याला मदतीचा हात देऊन सज्जातून त्यांनी बाहेर काढले. इतर नागरिकांनी घरत यांना मदत केली. अशाप्रकारे चिमुकल्यासह सहा जणांना आगीपासून बचावण्यात घरत यांना यश आले. आगीच्या झळांमध्ये दोन महिला भाजल्या आहेत. पालिका अग्निशमन दलाचे जवान तोपर्यंत घटनास्थळी आले. त्यांनी आग तात्काळ आटोक्यात आणली. दीपक घरत या हवालदाराच्या तत्परतेचे कल्याणमध्ये कौतुक केले जात आहे. मुंबई पोलीस दलात आपण फोर्स वन कमांडो म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे याचे प्रशिक्षण असल्याने आपण आग लागलेल्या घरातील सहा सदस्यांना जीव धोक्यात घालून वाचवू शकलो. यामध्ये खूप समाधान आहे, असे हवालदार घरत यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House fire in kalyan leakage from cylinder two women injured kalyan news ysh
First published on: 30-11-2022 at 10:37 IST