ठाणे – नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात घट झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. परंतू, गेल्या काही दिवसांत पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्यावेळेस उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. या वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. अंगदुखी, सर्दी-खोकला, घसा दुखणे ताप या आजाराने नागरिक त्रस्त झाले असून दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याची माहिती खासगी डॉक्टरांकडून दिली.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात १४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. वातावरणात गारवा पसरला होता. दुपारच्या वेळेस देखील हा गारवा कायम असायचा. परंतू, मागील काही दिवसांत तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ३३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. परंतू, वातावरणात झालेल्या या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. सर्दी -खोकला, ताप अंगदुखी आणि घसा दुखीने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील छोट्या दवाखान्यात तसेच आरोग्य केंद्रात या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेले काही दिवसांपासून दररोज या आजाराचे ३०-४० रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याची माहिती कोपरी भागातील डॉ. नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

हेही वाचा >>>ठाण्यात फेरिवाला क्षेत्र निश्चितीसाठी रस्त्यांचे होणार सर्वेक्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वातावरणात कशी काळजी घ्यावी ?

ऐन हिवाळ्याच्या दिवसात तापमान वाढले असले तरी थंड पेयाचे सेवन करणे टाळले पाहिजे. सध्या प्रदूषण देखील वाढले आहे. ज्यांना श्वसनाचा त्रास होतो अशा नागरिकांनी मुखपट्टीचा वापर केला पाहिजे, असा सल्ला ठाण्यातील एका खासगी डॉक्टरांनी दिला.