डोंबिवली : येथील औद्योगिक क्षेत्रातील भागात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. मुबलक पाणी येत नसल्याने रहिवासी हैराण आहेत. अनेक रहिवासी विकतचे पाणी आणून घरात वापरत आहेत. एमआयडीसी परिसरात नव्याने गृहसंकुले उभी राहत आहेत. या भागाचा पाणी पुरवठा त्या भागात वळविला जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी पाणी टंचाईची परिस्थिती यापूर्वी नव्हती. नवीन गृहसंकुले वाढल्यापासून हे प्रकार सुरू आहेत, असे रहिवाशांनी सांगितले. या कमी दाबाच्या पाणी टंचाई बाबत एमआयडीसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सांगूनही त्याची दखल घेतली जात नाही. एमआयडीसीतील बहुतांशी रहिवासी वर्ग नोकरी, व्यवसायातील आहे. नोकरी, मुलांच्या शाळा सांभाळून रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काही रहिवासी घरा लगतच्या कुपनलिकेतील पाणी स्वच्छता गृहात वापरून वेळ निभावून नेत आहेत.

हेही वाचा : टिएमटीचा पर्यावरणपुरक बस खरेदीवर भर, डबल डेकर बसगाड्या खरेदी प्रस्तावित, तिकीट दरात वाढ नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमआयडीसी भागात कधी नव्हे एवढी पाणी टंचाई आता सुरू झाली आहे. ही परिस्थिती आता असेल तर उन्हाळ्यात हे प्रमाण वाढण्याची भीती आहे. एमआयडीसीचा पाणी पुरवठा वाढवावा या मागणीसाठी अरविंद टिकेकर, अश्विनी पेंडसे, कनिका गद्रे, डाॅ. मनोहर अकोले, भारती मराठे, मिलिंद जोशी, ऋतुजा केतकर, डाॅ. मंजुषा पवार, चंद्रशेखर देव, भालचंद्र म्हात्रे, राजू नलावडे, प्रिया दामले, प्रकाश खरे, संजय गोगटे, महेश साटम, राजेश कोलापे, मुकुंद साबळे, राजीव देशपांडे, सागर पाटील यांनी एमआयडीसीचे उपअभियंता आनंद गोगटे यांची बुधवारी भेट घेतली. त्यांना एक निवेदन देऊन एमआयडीसी भागाचा पाणी पुरवठा पुरेशा दाबाने होईल अशी मागणी केली. कमी दाबाने पाणी पुरवठा का होतो याची पाहणी करून पुरेशा पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अधिकाऱ्याने रहिवाशांना सांगितले.