कल्याण : डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिम भागात फेरीवाल्यांचा प्रश्न अधिक आहे. या भागातील फेरीवाल्यांची कारवाईसाठी येणाऱ्या पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकावर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली आहे. या प्रकाराची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या, पोलीस ठाण्यात हल्ल्याची नोंद असलेल्या फेरीवाल्यांवर पालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी शुक्रवारी दिली.

डोंबिवली, कल्याणमध्ये व्यवसाय करणारे बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, मस्जिद, भायखळा, अंधेरी भागातील रहिवासी आहेत. हे फेरीवाले पालिका कर्मचाऱ्यांना न घाबरता दिवसभर डोंंबिवली पूर्व, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करतात. डोंबिवली पूर्व भागात ग प्रभाग हद्दीत सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई सुरू असते. सुट्टीच्या दिवशी या प्रभागातील कामगार फेरीवाल्यांना हटविण्याचे काम करतात. परंतु, बाजुच्या फ प्रभाग हद्दीतील नेहरू रस्ता, फडके रस्ता, चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक भागातील फेरीवाल्यांवर दिखाव्या पुरती कारवाई केली जात असल्याचा आरोप होत आहे.

1195 minor girls missing from Nagpur in three years
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता
navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
virar Sand Mafia, Sand Mafia active
वसई विरार : खाडी किनारी वाळू माफिया सक्रिय, भरारी पथकाची कारवाई, ४ बोटी केल्या नष्ट
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

हेही वाचा : डोंबिवली : भरधाव वाहनाने दिली चार ते पाच वाहनांना धडक; ठाकुर्लीत घडला प्रकार

फ प्रभागाने दिखाव्याची कारवाई केली की ते फेरीवाले तात्पुरते ग प्रभागाच्या हद्दीत येतात. ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाला दुहेरी पध्दतीने काम करावे लागत आहे. ग प्रभागाच्या आक्रमक कारवाईमुळे दोन दिवसांपूर्वी राहुल गुप्ता या फेरीवाल्याने सुनील सुर्वे या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत मारण्याची धमकी दिली आहे. पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी दिलीप गुप्ता, बाबू चौरासिया, अनिल गुप्ता या फेरीवाल्यां विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत मासळी बाजार बंद

मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी आयुक्तांची भेट घेऊन गुन्हेगार फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई केली नाहीतर त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा पालिकेला दिला आहे. त्यावेळी सोमवारपासून पोलीस आणि पालिकेची पथके कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाल्यांवर अतिक्रमण नियंत्रण उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू करतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. गुन्हेगार फेरीवाल्यांवर प्राधान्याने कारवाई केली जाणार आहे.