scorecardresearch

Premium

अल्पवयीन मुलीच्या तोंडात बोळे कोंबून घरात दोन लाखांची चोरी, डोंबिवलीत घडला प्रकार

दरवाजा उघडा असल्याने दोन अनोळखी इसम डाॅ. सिंह यांच्या घरात घुसले.

theft in dombivli doctor home, dombivli doctor house theft
अल्पवयीन मुलीच्या तोंडात बोळे कोंबून घरात दोन लाखांची चोरी, डोंबिवलीत घडला प्रकार (संग्रहित छायाचित्र)

डोंबिवली : येथील पूर्व भागात नांदिवली टेकडी भागातील बामणदेव मंदिर भागात एका डाॅक्टरच्या घरात दोन चोर शिरले. त्यांनी घरातील एका आठ वर्षाच्या मुलीच्या तोंडात बोळे कोंबून तिला धमकावून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने, ४० हजार रूपयांची रोख रक्कम असा एकूण दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे.

नांदिवली टेकडी भागात राहणारे डाॅ. सदानंद सिंह यांच्या घरात हा प्रकार घडला आहे. या चोरी प्रकरणी डाॅ. सिंह यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले, डाॅ. सदानंद सिंह रविवारी संध्याकाळी सहा वाजता घराबाहेर पडले होते. त्यांच्या घरात त्यांची जिवा ही आठ वर्षाची मुलगी होती. दरवाजा उघडा असल्याने दोन अनोळखी इसम डाॅ. सिंह यांच्या घरात घुसले. त्यांनी घरात लहान मुली व्यतिरिक्त कोणी नाही याचा अंदाज घेतला.

Chhagan Bhujbal and Manoj Jarange
“मनोज जरांगेंच्या मागण्या मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच चालल्या आहेत, आता..”; छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत
monkey nuisance in Konkan
कोकणात माकडांचा उपद्रव टाळण्‍यासाठी देशी जुगाड
rain in Kailash Khers program the audience flees by covering chairs as umbrellas
वर्धा : कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात पावसाचे आगमन, खुर्च्यांची छत्री करीत श्रोत्यांचे पलायन; पाच हजार खुर्च्या गायब
Abhishek Ghosalkar Live (1)
VIDEO : अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराचा थरार समोर, कथित हल्लेखोराने स्वतःच्याच फेसबुकवरून केलं होतं लाईव्ह

हेही वाचा : चविष्ट जेवणासाठी मुलाचं राक्षसी कृत्य; विळ्याने वार करत जन्मदात्या आईचा घेतला जीव

मुलीने ओरडा करू नये म्हणून मुलगी जिवा हिला धाकदपटशा दाखवून तिच्या तोंडात चोरट्यांनी कापडाचे बोळे कोंबले. तिला एका जागी बसवून ठेऊन चोरट्यांनी घरातील कपाटातील ४० हजार रूपयांची रोख आणि दीड लाखाहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. डाॅ. सिंह एक तासाने घरी परतले तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीला आला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In dombivli theft of rupees 2 lakhs in doctor house jewelleries also stolen css

First published on: 28-11-2023 at 17:29 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×