डोंबिवली येथील पूर्वेतील गोग्रासवाडीचा राजा या गणपतीची आगमन मिरवणुकीतून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत जात असताना एका तरूणाने मिरवणुकीतील एका तरूणावर काचेच्या बाटलीने जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात काचेची बाटली फुटून दोन जणांना लागली. त्यात ते जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्याने काही वेळ मिरवणुकीत गोंधळ उडाला.

रविवारी रात्री दहा वाजता हा प्रकार वाजे मातोश्री पोळीभाजी केंद्रासमोरील रस्त्यावर घडला. याप्रकरणी रोहित राजकुमार सोनी (२४) याने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गणेश नावाच्या (२२) इसमा विरुध्द पोलिसांनी सोनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा… डोंबिवलीतील देवीचापाडा खाडी किनारी कांदळवनावर भराव टाकणाऱ्या भूमाफियांवर गुन्हा

पोलिसांनी सांगितले, रविवारी रात्री तक्रारदार रोहित सोनी आणि त्याचे मित्र असिफ शेख, अल्ताफ शेख, समीर शेख आणि राज उशीरे हे गोग्रासवाडीचा राजा या गणपती आगमन मिरवणुकीत सहभागी झाले होते. गणपती मखराच्या दिशेने वाजतगाजत नेण्यात येत होता. या मंडळाचे सदस्य गणपती बाप्पाचा जयघोष करत होते. यावेळी रोहित, त्याचे मित्र असिफ, अल्ताफ, समीर, राज हेही आनंदाने या मिरवणुकीत सहभागी होऊन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत मिरवणुकीतून चालले होते.

ही मिरवणूक सुरू असताना अचानक आरोपी गणेश हातात काचेची बाटली घेऊन मिरवणुकीत घुसला. त्याने काही कळण्याच्या आत असिफ शेख याच्या मानेवर बाटली मारली. काचेची बाटली असल्याने ती माऱ्याने फुटून तुटलेल्या बाटलीचा घाव असिफला लागला. त्या काचा उडून त्याच्या शेजारी चालणाऱ्या राज उशीरे याला लागल्याने त्याच्या नाकाला दुखापत झाली.

हे ही वाचा… खड्डे, गणपती आगमन मिरवणुकांमुळे कल्याण-डोंबिवली वाहन कोंडीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असिफ आणि मित्रांनी तात्काळ गणेशला अडवून तु हे कृत्य का केले म्हणून जाब विचारला. त्यावेळीही गणेशने आक्रमक भूमिका घेऊन तक्रारदारांना मारहाण करून दुखापत केली. पोलीस उपनिरीक्षक एस. के. शेख याप्रकरणाचा तपास करत आहेत.