कल्याणमध्ये हॉटेल चालकाने ग्राहकाच्या डोक्यात दगड मारुन केले गंभीर जखमी

टेल मालक निशू पांडे यांच्यासह साथीदारांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ग्राहकाच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणमध्ये हॉटेल चालकाने ग्राहकाच्या डोक्यात दगड मारुन केले गंभीर जखमी
संग्रहित छायचित्र

कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्या वरील कशीष ऑर्केस्ट्रा बारमध्ये हॉटेल मालकाने ग्राहकाला बेदम मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हॉटेल मालक निशू पांडे यांच्यासह साथीदारांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ग्राहकाच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजीत झा (२७) असे गंभीर जखमी झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ येथे कशीष आर्केस्ट्रा बार आहे. बुधवारी रात्री रंजित झा आपल्या मित्रांसोबत तेथे मेजवानी करण्यासाठी गेला होता. त्याचे मित्र सूरज झा, प्रशांत गुप्ता हे तेथे उपस्थित होते. रंजितला पाहून हॉटेल मालक निशू पांडे यांनी त्याला हॉटेलमध्ये बसण्यास मज्जाव केला. रंजितने त्यास नकार देताच त्याला लाथाबुक्कयाने बेदम मारहाण केली.

रंजित हॉटेल बाहेर जात नाही म्हणून निशू पांडे, त्यांचा साथीदार अभिषेक यांनी रंजितला बाहेर खेचत आणले. या प्रकाराने हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. बाहेर आणल्यानंतर रंजितला हॉटेल चालकांनी मारहाण केली. अभिषेकने रस्त्यावरील दगड उचलून तो निशू पांडे यांच्या डोक्यात टाकून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. दगडीच्या माराने रंजितच्या डोक्याला, डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

या प्रकारानंतर रंजितने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन निशू, अभिषेक यांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In kalyan hotel driver seriously injured a customer by throwing a stone on his head amy

Next Story
बदलापूरः अखेर बारवी धरण ओव्हरफ्लो ; जिल्ह्याची पाणीचिंता मिटली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी