कल्याण : कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली भागातील राधा कृष्ण मंदिरातील चोरीची घटना ताजी असताना, याच भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी करून चोरट्यांनी १५ हजार रूपयांची वहाणावळ, १४ पितळेची भांडी चोरून नेली आहेत. घरफोड्यांबरोबर चोरट्यांनी आता आपला मोहरा मंदिरांकडे वळविल्याचे चित्र आहे. खडेगोळवली पोलीस चौकीच्या मागे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. परिसरातील भाविक नियमित या मंदिरात दर्शनासाठी येतात.

चोरट्याने या मंदिरावर पाळत ठेऊन मंदिराचा मुख्य प्रवेशमार्गातील दरवाजा धारदार कटावणीने उघडून मंदिरात प्रवेश केला. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात असलेली दानपेटी, मंदिराच्या गर्भगृहाजवळील खोलीत देवासाठी लागणारे ताम्हण, पंचपाळ, भजनासाठी लागणाऱ्या टाळ, चकवा, आरतीपत्र अशी एकूण पितळेची १२ भांडी चोरट्याने चोरून नेली.

हेही वाचा : Jitendra Awhad: “घोडा माझा लाडका नवी योजना”, जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी खेचरं येतील”

सकाळी नेहमीप्रमाणे पुजारी मंदिर उघडण्यासाठी आला त्यावेळी त्यांना मंदिराचा मुख्य दरवाजा तोडला असल्याचे आणि मंदिरात चोरी झाले असल्याचे दिसले. पुजाऱ्याने ही माहिती तातडीने या मंदिराचे खजिनदार जगदीश बाळकृष्ण तरे यांना दिली. चोरट्याने १५ हजार रूपयांचा ऐवज मंदिरातून चोरून नेला आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले असताना मंदिराच्या विश्वस्तांना एक अस्पष्ट स्वरूपात दिसणारा एक इसम रात्रीच्या वेळेत मंदिरात चोरी केली असल्याचे दिसत आहे. या चित्रणाच्या आधारे जगदीश तरे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा : बदलापूर: उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे कोंडी वाढली; पूर्व पश्चिम प्रवासाठी एक तासाचा काळ, प्रवासी हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक एच. एल. शिर्के याप्रकरणाचा तपास करत आहेत. गेल्या वर्षभरात डोंबिवली, कल्याणमधील सात ते आठ मंदिरांमध्ये चोऱ्या होऊन मंदिरांमधील दानपेट्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.