कल्याण : कल्याण मधील ज्येष्ठ शिवसैनिक आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान बाळ हरदास यांची गुरुवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक असलेले जिजाऊ संघटनेचे नीलेश सांबरे यांनी भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नीलेश सांबरे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळते का या प्रतीक्षेत आहेत. राजकीय पक्षांनी उमेदवारी नाही दिली तर, अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सांबरे यांनी केली आहे.

भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही आहे. या पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीकडून सुरू आहेत. त्याच बरोबर काँग्रेसनेही भिवंडी लोकसभेवर दावा ठोकला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रस्थापित खासदार केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्याविषयी सहा विधानसभा मतदारसंघात नाराजी आहे. त्या नाराजीचा फायदा उठविण्याची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि जिजाऊचे सांबरे यांची व्यूहरचना आहे.

Nandurbar lok sabha seat, dr heena gavit Objects to Congress Candidacy Application, BJP candidate dr heena gavit, Gowaal Padavi s Candidacy ApplicationCongress Candidate Gowaal Padavi, marathi news, nandurbar news,
नंदुरबारमध्ये काँग्रेसची उमेदवारी धोक्यात ? भाजपच्या डॉ. हिना गावित यांची हरकत
Ranajagjitsinha Patil sharad pawar
“आमदार नसतानाही राणाजगजीतसिंह पाटलांना मंत्री केलं, पण त्यांचे…”, शरद पवार यांचा टोला
Bharatiya Jawan Kisan Party leader Raghunath Patil filed nomination form in Hatkanangle Lok Sabha Constituency
हातकणंगलेत आणखी एका शेतकरी नेत्याचा अर्ज दाखल; रघुनाथदादा पाटील रिंगणात
satara lok sabha seat, sharad pawar, Candidate shashikant shinde, navi mumbai, apmc market, god s darsahn, meet mathadi workers, supriya sule, bjp, Udayanraje Bhosale , maharashtra politics, political news, marathi news,
शशिकांत शिंदे सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार….

हेही वाचा : सकाळच्या डोंबिवली, कल्याण लोकल रद्द केल्याने प्रवासी संतप्त

भिवंडी लोकसभेचा भाग हा कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघापर्यंत आहे. कल्याण पश्चिमेत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक मोठा निष्ठावान गट आहे. शिंदे गटाकडून अनेक दबाव येऊनही या निष्ठावानांनी शिंदे गटात दाखल होणे पसंत केलेले नाही. या निष्ठावानांची आपणास भिवंडी लोकसभेसाठी मदत होईल या अपेक्षेने सांबरे यांनी बाळ हरदास यांची भेट घेतली असल्याची माहिती हरदास समर्थकांनी दिली.

हरदास इच्छुक

कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना ज्येष्ठ नेते बाळ हरदास यांनी मातोश्रीकडे इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे दावेदार आहेत. मुख्यमंत्री पिता-पुत्राला शह देण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बाळ हरदास .यांना कल्याण लोकसभेतून निवडणूक लढविण्यासाठीची गळ घातली आहे. बाळ हरदास हे कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सभापती, धाराशिवचे जिल्हा संपर्कप्रमुख, कल्याण डोंबिवली पालिकेतील कामगार संघटनेचे नेतृत्व ते करतात.

हेही वाचा : तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

हरदास यांनी कल्याण लोकसभेसाठी जोरदार तयारी केली तर त्याला निवडणुकीत पूर्ण साथ देण्याचा शब्द नीलेश सांबरे यांनी हरदास यांना दिल्याचे हरदास समर्थकांनी सांगितले. भिवंडी लोकसभेसाठी कल्याण पश्चिमेतून बाळ हरदास यांनी सांबरे यांना साहाय्य करायचे आणि त्या बदल्यात सांबरे कल्याण लोकसभेसाठी हरदास यांना मदतीचा हात देतील, असे सूत्र या बैठकीत ठरल्याचे हरदास समर्थकांनी सांगितले.

कल्याण, भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिजाऊचे नीलेश सांबरे यांनी आपली भेट घेतली. कल्याण लोकसभेसाठी आपण इच्छुक आहोत. त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. कल्याण लोकसभेसाठी आपले नावे अंतीम झाले तर सांबरे यांनी याठिकाणी आपणास सहकार्य करण्याची आणि कल्याण पश्चिमेत भिवंडी लोकसभेसाठी आपण त्यांना पूर्ण ताकदीने मदत करण्याची प्राथमिक चर्चा भेटीत झाली आहे.

बाळ हरदास (ज्येष्ठ शिवसैनिक, उद्धव बाळासाहेब ठाकरे, कल्याण)