डोंंबिवली: येथील गोळवली भागातील रिगल लेडिज बारमध्ये शनिवारी रात्री दोन ग्राहकांना या बारमधील कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करत काठीने बेदम मारहाण केली. ग्राहकाच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी आनंदकुमार सिंग आणि इतर तीन अशा चार हाॅटेल सेवकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

खोणी पलावा भागात राहणारे आयुश सुधाकर शेट्टी (१९) याने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार आयुश आणि त्याचा मित्र रोहन कांबळे हे दारू पिण्यासाठी रिगल लेडिज बारमध्ये गेले होते.

हेही वाचा… कल्याण: रिक्षाप्रवासादरम्यान महिलेचे मंगळसुत्र खेचले;पत्रीपूलावरील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दारू पिऊन झाल्यावर रोहन कांबळे हा नृत्य गायन सुरू असलेल्या मंचकावर गेला. हा प्रकार सहन न झाल्याने बार मधील एका कर्मचाऱ्याने रोहनला मंचकावरून खाली ओढले. त्याचा राग येऊन आयुशने कर्मचाऱ्याला फैलावर घेतले. त्याचा राग कर्मचाऱ्याला आला. त्याने तक्रारदाराला धक्काबुक्की केली. त्यावेळी बारमधील इतर दोन जण आयुश यांंच्याजवळ आले. त्यांनी त्याला मारहाण केली. आयुशला भोजन कक्षात नेऊन तेथे आनंदकुमार सिंग यांनी बेसबाॅल खेळण्याच्या काठीने बेदम मारहाण केली. तक्रारदाराच्या पायाला या मारहाणीत दुखापत झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.