ठाणे : महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभेची जागा कुणाच्या पारड्यात पडणार याविषयी महायुतीतील शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच रविवारी दिवसभर ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच नेत्यांची जम्बो बैठक ठाण्यात घेण्यात आल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. निवडणुकाची तयारी, घोषणापत्र काय असावे याचा आढावा तसेच विधानसभा क्षेत्रात निवडणूक कार्यालय कुठे असावीत आणि त्यामधील कामाची रचना कशी असावी याविषयी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर यंदा भाजपने दावा सांगितला असून येथून कुणाला रिंगणात उतरवायचे यासाठी वेगवेगळ्या नावांची पक्षाकडून चाचपणी देखील केली जात आहे. शिवसेनेतील १३ खासदार सध्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आहे. या सर्व खासदारांना उमेदवारी देण्यास भाजप तयार नसल्याच्या चर्चा सातत्याने पुढे येत असून मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी याविषयी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली आहे. ठाणे आणि कल्याण हे दोन लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचे मानले जातात. कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र डाॅ.श्रीकांत हे खासदार असून ठाण्याची जागाही कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना हवी आहे. ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असले तरी मुख्यमंत्र्यांचा कोपरी-पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभेत असल्याने हा मतदारसंघ भाजपला सोडल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम पक्षात दिसतील असे मुख्यमंत्री समर्थकांचे मत आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांचे ठाण्यातील राजकारण हे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मार्गाने चालत आल्याचे त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. दिघे यांनी ठाण्याची जागा भाजपकडून खेचून आणली होती. असे असताना ठाणे पुन्हा भाजपला देणे हे राजकीयदृष्टया सोयीचे नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

eknath shinde bhavna gavli hemant patil
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेनं भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
Ranjitsinh Mohite patil, Madha Lok Sabha,
माढ्यात आमदार रणजितसिंह मोहिते भाजपकडून अघोषित बहिष्कृत
Brand Thackeray
ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे… उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… ठाण्यासाठी रॅप गाणे
devendra fadnavis
इंदापूरमधील नाराजीवर मनोमीलन सभेचा उतारा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मेळावा

हेही वाचा : रेल्वे प्रवासी संघटनांचे ३१ मार्चला ‘भीक मागो’ आंदोलन; कर्जत, कसारा, कल्याण मार्गावर समस्यांचा डोंगर

भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी

महायुतीच्या जागावाटपांच्या बैठका अंतिम टप्प्यात असताना रविवारी ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक मोठी बैठक ठाण्यातील महाजनवाडी येथे आयोजित केली गेल्याने मुख्यमंत्री समर्थकांमध्ये कमालिची अस्वस्थता आहे. ठाणे लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख नेते, पदाधिकारी तसेच भाजपच्या निवडणुक व्यवस्थापन समितीचे सदस्य असे ३७५ ते ४०० जणांची जम्बो कार्यकारणी यावेळी उपस्थित होती. भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या अनुशंगाने अशा व्यवस्थापन समित्या तयार केल्या आहेत. या निवडणुक व्यवस्थापन समितीत ३७ विभाग आहेत. यामध्ये लोकसभा, विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी, संयोजक, विस्तारकांचा समावेश आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकांसाठी निवडणुक कार्यालय कुठे आणि कसे असावे, काॅल सेंटरची व्यवस्था, उमेदवाराचा प्रवास, लोकसभानिहाय नेत्यांचा प्रवास, सोशल मिडीयाचे व्यवस्थापन, घोषणापत्र, लाभार्थी संपर्क, युवा संपर्क अशा रणनितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे प्रचार सामुग्री आणि विशेष संपर्क कार्यक्रमांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती विश्वसनिय सुत्रांनी लोकसत्ताला दिली.

हेही वाचा : मुंबई- नवी मुंबई- बदलापूर नवा मार्ग?

शिवसेनेत अस्वस्थता

ठाणे लोकसभेची जागेवर दोन पक्षात रस्सीखेच सुरु असताना भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमुळे शिंदेसेनेत कमालिची अस्वस्थता पसरली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला हा मतदारसंघ हवा असला तरी संपूर्ण मतदारसंघात या पक्षाचा एकही चेहरा अजून कार्यरत झालेला नाही. नवी मुंबई, मिरा-भाईदर भागात पक्षाकडून कोण उमेदवार असेल याविषयी कमालिचा संभ्रम आहे. माजी महापौर नरेश म्हस्के, माजी आमदार रविंद्र फाटक आणि विद्यमान आमदार प्रताप सरनाईक अशी तीन नावे पक्षात चर्चेत असली तरी यापैकी कुणालाही अजूनही स्पष्ट संदेश दिला गेलेला नाही. त्यामुळे लोकसभा म्हणून पक्षाच्या बैठका, कार्यक्रमांना अजूनही सुरुवात झालेली नाही. दुसरीकडे भाजप नेत्यांच्या जोरदार बैठका मतदारसंघात सुरु झाल्याने शिंदे सेनेत संभ्रम कायम आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी बांधणी असून हा पक्षाचा बालेकिल्ला आहे. वेगवेगळे कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, विकास कामांचा शुभारंभाच्या माध्यमातून शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते सतत लोकांच्या संपर्कात असतात. स्वत: मुख्यमंत्री दररोज हजारो लोकांना भेटत असतात. त्यामुळे तळागळात पोहचलेल्या आमच्या पक्षाला वातावरणनिर्मीतीसाठी फार काही करावे लागत नाही, असा टोला शिवसेनेच्या एका नेत्याने लोकसत्ताशी बोलताना लगाविला.