ठाणे : गेल्याकाही वर्षांपासून कर्जत, कसारा आणि कल्याण मार्गावरील रेल्वे प्रवाशांना प्राथमिक मुलभूत सुविधा मिळत नाही. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि मालवाहू रेल्वेगाड्यांमुळे लोकलची वाहतूक रखडत आहे. श्रीमंतांकरिता वंदे भारत सारख्या ट्रेन्स चालविल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकही जादा लोकल फेरी चालविली जात नाही. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून अधिक महसूल मिळतो. त्यामुळे त्यांना प्राधान्य दिले जाते असे उत्तर रेल्वे प्रशासनाकडून दिले जात असल्याने कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे ३१ मार्चला सर्व रेल्वे स्थानकांत भीक मांगो आंदोलन केले जाणार आहे. यातून जमा होणारा पैसा मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना देण्यात येणार आहे.

कल्याण ते कसारा- कर्जत या मार्गावरील एक -दोन स्थानकांचा अपवाद वगळता सर्वच रेल्वे स्थानके बकाल झाले आहेत. या मार्गांवरील आधीच असलेल्या मर्यादित लोकल सेवा दररोज उशिराने रखडत रखडत सुरू असतात. लांब पल्ल्याच्या आणि वंदे भारत गाड्यांना दिले जाणारे प्राधान्य यामुळे हे होते असे प्रवाशांचे म्हणणे आहे. लोकलला होणारी गर्दी आणि असुरक्षित प्रवासातून होणाऱ्या अपघातातही वाढ झाली आहे. या मार्गांवरील अपुरे पोलीस मनुष्य बळ, तिकीट तपासणीस आणि सफाई कर्मचारी यामुळे प्रवासातील बोजवरा वाढला आहे. महिला प्रवाशांकरिता स्वच्छतागृहाच्या सुविधा बऱ्याच ठिकाणी नाहीत. फलाट पोकळी ही या मार्गांवरील अत्यंत मोठी समस्या झाली आहे. ज्यातून अपघात घडत आहेत. जेथे आवश्यक आहे तेथे पादाचारी पुल बांधण्यात आले नाही. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडणे अपरिहार्यता बनले आहे.

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश

हेही वाचा : मुंबई- नवी मुंबई- बदलापूर नवा मार्ग?

रेल्वे रुळांलगत संरक्षक भिंती नाहीत. स्थानकात आवश्यक पंखे,बाकडे नाहीत आणि ना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाहीत. या सर्व समस्या या भागातील सर्वसामान्य प्रवाशांना भोगाव्या लागत आहे. रेल्वे प्रशासन हे कायमच निधीची कमतरता असल्याचे सांगितले जाते. आम्ही प्रवासी संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनाला काही स्थानकात सीआरएस निधीही उपलब्ध करुन दिला आहे. त्यातही बऱ्याच जाचक अटी असल्याने व समन्वय नसल्याने कोणीही खाजगी कंपनी वा फर्म या मदतीला पुढे येण्यास टाळतात. त्यामुळे आम्ही ३१ मार्चला प्रत्येक स्थानकात प्रवाशांकडे भीक मागून जो काही पैसा गोळा होईल तो मा विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना सुपूर्द करू जेणेकरून आमच्या या भागातील काही प्रमुख कामे जी निधी अभावी रखडली आहेत ती मार्गी लागतील असा टिका संघटनेने केली आहे. भीक मागणे हा गुन्हा आहे हे आम्हाला ज्ञात आहे. मात्र याशिवाय आता दुसरा पर्याय शिल्लक नसल्याने आम्ही ही मोहीम हाती घेत आहोत त्यात अडथळा आणू नये ही विनंती. या जमा झालेल्या निधीचा उल्लेख केलेल्या कामाकरिताच वापर व्हावा असे संघटनेचे अध्यक्ष राजेश घणगाव यांनी सांगितले.

हेही वाचा : स्थानके, लांब पल्ल्याच्या गाडयांमधून ‘रेल नीर’ गायब

या प्रकल्पांसाठी मागणार भीक

१) कल्याण ते कसारा तिसरी चौथी मार्गीका आणि कल्याण बदलापूर तिसरी चौथी मार्गीका
२) स्थानकात महिलांकरिता स्वच्छतागृह
३) फलाटाच्या उंचीची कामे
४) पोलीस बळ आणि सफाई कर्मचारी संख्या वाढविणे
५) फलाटावर पंखे बसण्याकरिता बाकडे आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करणे
६) अत्यावश्यक प्राथमिक वैद्यकीय मदत