ठाणे : मुंबई आणि ठाणे शहरातील पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या भातसा धरणात जेमतेम ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा पाणीसाठा दोन महिने पुरेल एवढाच असल्याने शहरांवर पाणी कपातीचे संकट ओढावण्याची भिती व्यक्त होत असली तरी पाणी कपातीबाबत संबंधित प्राधिकरणाकडून कोणतेही आदेश लागू करण्यात आलेले नाही. यामुळे ठाणे महापालिकेने अद्याप तरी पाणी कपातीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्यामुळे ठाणेकरांना तुर्तास तरी जलदिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात. यापैकी ठाणे महापालिका स्वत:च्या योजनेसाठी भातसा धरणातून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकाही भातसा धरणातून पाणी उचलून त्याचा ठाणे शहरात पुरवठा करते. अशाप्रकारे भातसा धरणातून ठाणे शहराला एकूण ३३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा दररोज होतो. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून हे धरण महत्वाचे मानले जाते.

Waghbeel, waste water on road,
वाघबीळ गावात रस्त्यावर गटारगंगा, रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
unclean water supply, Thane, Rumors of unclean water,
ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई

हेही वाचा : घोडबंदर मार्गावरील महत्त्वाचे छेद रस्ते बंद, मुख्य मार्गावरील कोंडीमध्ये काही प्रमाणात दिलासा

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा ३२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यामध्ये भातसा धरणाचाही समावेश आहे. या धरण क्षेत्रात ३१.६१ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी धरणात ३७.९० टक्के तर, २०२२ मध्ये ४३.६२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा धरणात पाणीसाठा कमी आहे. दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणी कपात लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी संबंधित प्राधिकरणाने अद्याप तरी पाणीकपातीबाबत कोणतेही आदेश पालिकांना दिलेले नाहीत. यामुळे पालिकांनी कोणतीही कपात लागू केलेली नाही. पालिकांकडून नेहमीप्रमाणेच पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा केला जात आहे.

हेही वाचा : आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर शिंदे गटाचे नरेश म्हस्के चप्पल घालून? केदार दिघे यांचा घणाघाती आरोप

ठाणे महापालिका क्षेत्रात भातसा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या धरण क्षेत्रातील पाणीसाठा कमी झाल्याबाबत किंवा पाणी कपातीबाबत संबंधित प्राधिकरणाने अद्याप कळविलेले नाही. यामुळे शहरात सध्या तरी कोणतीही पाणी कपात लागू करण्यात आलेली नसून याठिकाणी नेहमीप्रमाणेच पाणी पुरवठा सुरू आहे.

विनोद पवार (उपनगर अभियंता, ठाणे महापालिका)