ठाणे : मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या योजनेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी “घोडा माझा लाडका” नवी योजना आल्याची मिश्कील टीप्पणी सरकारवर केली आहे. तसेच भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी ‘खेचरं’ येतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्टमधून विनोदी शैलीत भाष्य करत सरकारला टोले लगावले आहेत. आव्हाड म्हणाले, “आज बातमी आलेय की, मुंबई पोलीस दलातील अश्वदलाची पुनर्निर्मिती करणार. पूर्वीच्या मुंबईत पोलीस घोड्यावरून गस्त घालत होते. आता ती पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्तपत्रातील बातमीतून समजले. आता भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी ‘खेचरं’ येतील, असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा : बदलापूर: उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे कोंडी वाढली; पूर्व पश्चिम प्रवासाठी एक तासाचा काळ, प्रवासी हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिथे माणसांना चालायला जागा नाही; तिथे घोडे कुठे नेणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करत निर्णय घेता येतो, म्हणून असा निर्णय घ्यायचा, असेही ते म्हणाले. ही नवीन योजना आहे, ” माझा लाडका घोडा” आणि हो, हे घोडे जेव्हा मुंबईत फिरतील; तेव्हा त्यांच्या मागे कुत्रे लागतील ते वेगळेच” , असे म्हणत त्यांनी सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडविली आहे.